स्पेशल

एसबीआय बँकेने ग्राहकांसाठी घेतला मोठा निर्णय ! SBI च्या ‘या’ FD योजनेची मुदत वाढली, ग्राहकांना मिळणार जबरदस्त परतावा

Published by
Tejas B Shelar

SBI Bank FD News : जर तुम्हीही येत्या काही दिवसात एफडी मध्ये पैसे गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि उत्कृष्ट परताव्याच्या दृष्टीने मुदत ठेव योजना खूपचं लोकप्रिय झाल्या आहेत.

विशेषत: ज्येष्ठ नागरिक आपली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असावी आणि त्यावरील व्याजाचे उत्पन्नही जास्त असावे, या विचाराने FD मध्ये गुंतवणूक करण्याला अधिक पसंती दाखवतात.

महिला वर्ग देखील अलीकडे एफ डी मध्ये पैसे गुंतवण्याला विशेष प्राधान्य दाखवत आहे. देशातील अनेक प्रमुख बँकांनी एफ डी वरील व्याजदरात सुधारणा देखील केली आहे.

त्यामुळे फिक्स डिपॉझिट मध्ये केलेली गुंतवणूक देखील आता गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरत आहे. दरम्यान देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने अर्थातच एसबीआय ने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

SBI ने सुरू केलेल्या एका विशेष एफडी योजनेची मुदत वाढवण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. बँकेने ग्राहकांना अधिक व्याज परतावा मिळावा यासाठी 400 दिवसांची विशेष FD योजना सुरू केली आहे.

या योजनेला एसबीआयने अमृत कलश FD योजना असे नाव दिले आहे. ही योजना जेव्हापासून सुरू झाली आहे तेव्हापासूनच चर्चेत आहे. या योजनेत अनेकांनी गुंतवणूक केली आहे. या योजनेची वाढती लोकप्रियता पाहता आता बँकेने या एफडी योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2025 पर्यंत वाढवली आहे.

ही योजना 12 एप्रिल 2023 ला सुरू झाली असून या योजनेला वेळोवेळी मुदत वाढ देण्यात आली आहे. या योजनेला 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थातच या योजनेत 31 मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की एसबीआयच्या अमृत कलश एफ डी योजनेत सामान्य ग्राहकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 7.10% या इंटरेस्ट रेट ने व्याज दिले जाते. दुसरीकडे या एफ डी योजनेत जेष्ठ नागरिक ग्राहकाने गुंतवणूक केली तर त्यांना 0.50% अतिरिक्त व्याजदर अर्थात 7.60% या दराने व्याज दिले जाते.

1 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार?

जर एसबीआयच्या या चारशे दिवसांच्या अमृत कलश एफडी योजनेत सामान्य ग्राहकाने एक लाख रुपये गुंतवलेत तर त्याला मॅच्युरिटीवर म्हणजे 400 दिवसानंतर एक लाख 7 हजार शंभर रुपये मिळणार आहेत. दुसरीकडे या योजनेत सीनियर सिटीजन ग्राहकांनी एक लाख रुपये गुंतवले तर त्यांना मॅच्युरिटी वर एक लाख 7 हजार 600 रुपये मिळणार आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com