SBI FD Scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आणि सर्वाधिक सुरक्षित बँक म्हणून ओळखली जाते. रिझर्व बँक ऑफ इंडियाने अलीकडेच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली होती यामध्ये खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी आयसीआयसीआय या दोन बँकांचा आणि एसबीआय या सरकारी बँकेचा समावेश होता.
या तीन बँका देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका म्हणून ओळखल्या जातात. अशा परिस्थितीत या तिन्ही बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांचे प्रमाण देखील फारच अधिक असल्याचे दिसते.
दरम्यान जर तुम्ही आगामी काळात एसबीआयच्या फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण एसबीआयच्या चारशे दिवसांच्या विशेष एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
एसबीआय कडून आपल्या ग्राहकांना अधिकचा परतावा मिळावा यासाठी काही विशेष FD योजना राबवल्या जात आहेत. बँकेकडून 444 दिवसांसाठी आणि चारशे दिवसांसाठी विशेष FD योजना सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान आता आपण चारशे दिवसांच्या एफडीची माहिती पाहणार आहोत. या एफडी योजनेसाठी काय व्याजदर लागू आहेत, यामध्ये पाच लाखाची गुंतवणूक केली तर ग्राहकांना किती रिटर्न मिळणार ? याचीच माहिती आज आपण या लेखातून पाहणार आहोत.
मंडळी एसबीआयच्या एफडी बाबत बोलायचं झालं तर बँकेकडून ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी योजना सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे एसबीआय विशेष एफडी योजना देखील सुरु करते.
एसबीआय कडून जी 444 दिवसांची विशेष एफडी योजना सुरू करण्यात आली आहे त्यावर बँकेकडून सर्वाधिक म्हणजेच 7.25 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
याशिवाय ही सरकारी बँक चारशे दिवसांची विशेष एफडी योजना चालवत आहे, ज्यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 7.10% दराने परतावा मिळतोय. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.60% दराने व्याज मिळते. म्हणजेच 0.50% अतिरिक्त व्याज मिळते.
एखाद्या सामान्य ग्राहकाने जर एसबीआयच्या चारशे दिवसाच्या विशेष FD योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला 7.10% दराने मॅच्युरिटीवर पाच लाख 40 हजार 89 रुपये मिळणार आहेत, म्हणजेच 40 हजार 89 रुपये रिटर्न मिळणार आहेत.
तसेच जर 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांनी म्हणजेच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी या एफडीमध्ये पाच लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटीवर म्हणजेच चारशे दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पाच लाख 43 हजार तीन रुपये मिळणार आहेत. यामध्ये 43 हजार 3 रुपये त्यांना व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.