SBI FD Scheme: फिक्स डिपॉझिटवर 7.60% व्याज मिळवायचे असेल तर 400 दिवसांसाठी एसबीआयच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक! मिळेल चांगला पैसा

Ahmednagarlive24 office
Published:

SBI FD Scheme:- गुंतवणुकीसाठी उपलब्ध पर्यायांमधून एखाद्या पर्यायाची निवड जेव्हा गुंतवणूकदार करतात तेव्हा सगळ्यात अगोदर पाहिले जाते ते म्हणजे गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी गुंतवणूकदारांना मिळतात त्या ठिकाणी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते.

या मुद्द्याला धरून जर आपण गुंतवणूक पर्यायांचा विचार केला तर बँकांच्या मुदत ठेव योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना तसेच सरकारच्या अल्पबचत योजनांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. कारण या पर्यायांमध्ये गुंतवणूक केली तर पैसा देखील सुरक्षित राहतो आणि परताव्याची हमी देखील मिळते.

त्यामुळे जर तुम्हाला देखील गुंतवणूक करायची असेल व ती मुदत ठेव योजनेमध्ये करायचे असेल तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका महत्त्वाच्या अशा मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट योजनेत करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाची महत्वपूर्ण योजना असून गुंतवणूकदारांना जास्त आर्थिक फायदा मिळवून देणारी योजना म्हणून ओळखली जाते.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत कलश योजनेमध्ये करा गुंतवणूक

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबवण्यात येणारी अमृत कलश योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना चांगला आर्थिक फायदा मिळतो. एफडीचे वैशिष्ट्ये असे असते की ग्राहकांना ठराविक कालावधीनंतर खात्रीशीर उत्पन्न मिळत असते. स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजना ही एक आकर्षक व लोकप्रिय योजना असून गुंतवणूकदारांसाठी यामध्ये गुंतवणूक करण्याची एक सुवर्णसंधीच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

कसे आहे अमृत कलश योजनेचे स्वरूप?

स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजना ही चारशे दिवसांची एफडी योजना आहे व यामध्ये सामान्य ग्राहकांनी गुंतवणूक केली तर यावर 7.10 टक्के व्याज मिळते व ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉईंट्स म्हणजे 7.60% पर्यंत अतिरिक्त व्याजदराचा फायदा मिळतो. या योजनेमध्ये ग्राहकांना कमाल दोन कोटी रुपये पर्यंतची रक्कम डिपॉझिट करता येते.

अमृत कलश योजनेची सुरुवात 12 एप्रिल 2023 रोजी करण्यात आलेली होती. परंतु या योजनेला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे बँकेच्या माध्यमातून या योजनेचे मुदत अनेक वेळा वाढवण्यात आलेली आहे. जेव्हा ही योजना सुरू केली गेली तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून प्रथमच 23 जून 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत अंतिम मुदत ठेवली होती.

नंतर बँकेने पुन्हा या योजनेची मुदत वाढून ती 21 मार्च 2024 पर्यंत केली. ही मुदत देखील संपली परंतु या योजनेला प्रतिसाद चांगला मिळत असल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून परत एकदा या योजनेची मुदत वाढवून आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत करण्यात आली.

ग्राहक या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात?

तुम्हाला देखील एसबीआयच्या या विशेष एफडी योजनेत खाते उघडायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत जाऊन खाते उघडू शकतात. तुम्हाला अमृत कलश एफडी योजनेसाठी खाते उघडण्याकरिता आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर व ईमेल आयडी इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात. बँकेच्या माध्यमातून तुम्हाला एक फॉर्म दिला जातो व तो फॉर्म भरल्यानंतर तुमचे खाते या योजनेत उघडले जाते.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe