SBI Home Loan EMI : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देते. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत येते.
यामुळे अनेक जण या बँकेकडून होम लोन घेण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

कारण की आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होम लोनची माहिती जाणून घेणार आहोत. एसबीआयचे होम लोन साठीचे सध्याचे व्याजदर काय आहेत, तसेच एसबीआय कडून जर तीस लाख रुपयांच होम लोन घेतले तर किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार? याबाबतची माहिती आज आपण या लेखातून घेणार आहोत.
एसबीआयचे सध्याचे व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देते. महत्त्वाचे म्हणजे आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर एसबीआयचे होम लोनचे व्याजदर आणखी कमी झाले आहेत.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केली होती. यानंतर या चालू आर्थिक वर्षात सुद्धा आरबीआय कडून रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी करण्यात आले.
अवघ्या काही महिन्यांच्या काळातच आरबीआयकडून 0.50 टक्क्यांनी रेपो रेट कमी करण्यात आली असून याचा परिणाम म्हणून देशभरातील बँकांकडून होम लोनचे व्याजदरात कपात केली जात आहे. आरबीआयकडून रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून सहा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.
यामुळे एसबीआयने सुद्धा होम लोनचे व्याजदर कमी केले असून सध्या एसबीआय आपल्या ग्राहकांना आठ टक्क्यांपासून ते 8.95% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. दुसरीकडे या बँकेचे टॉप-अप होम लोन साठीचे व्याजदर 8.30 टक्यांपासून ते 10.80% पर्यंत आहेत.
30 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता?
जर समजा एसबीआय कडून 8% व्याजदर आहे एखाद्या ग्राहकाला वीस वर्ष कालावधीसाठी 30 लाख रुपयांचे होम लोन मंजूर झाले तर अशा प्रकरणात संबंधित ग्राहकाला 25 हजार 93 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच संबंधित ग्राहकाला वीस वर्षांच्या कालावधीत 60 लाख 22 हजार 320 रुपये बँकेला भरावे लागणार आहेत. म्हणजेच या कालावधीत 30 लाख 22 हजार 320 रुपये व्याज स्वरूपात द्यावे लागणार आहेत.
मात्र आठ टक्के व्याजदरात होम लोन मिळवायचे असेल तर यासाठी तुमचा सिबिल स्कोर देखील तेवढाच मजबूत असणे आवश्यक आहे. असं म्हणतात की 800 किंवा 800 च्या आसपास ज्या लोकांचा सिबिल स्कोर असतो त्यांना बँकेकडून किमान व्याजदरात कर्ज मंजूर केले जाते.