SBI Home Loan EMI | SBI कडून Home Loan घेणे फायद्याचे! 10 वर्षांसाठी 30 लाखांचे गृहकर्ज घेतल्यास कितीचा EMI?

SBI अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून ग्राहकांसाठी विविध प्रकारची कर्ज योजना उपलब्ध करून देते. गृहकर्ज घेण्याचा विचार करत असणाऱ्या ग्राहकांसाठी सुद्धा SBI कडून आकर्षक व्याजदर आणि सोयीस्कर परतफेड योजना दिल्या जातात.

Published on -

SBI Home Loan EMI | अनेक जण घरासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असतात. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यामुळे होम लोन घेऊन घरनिर्मितीचे अनेकांचे स्वप्न असते. दरम्यान जर तुम्हीही होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

SBI अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून ग्राहकांसाठी विविध प्रकारची कर्ज योजना उपलब्ध करून देते. गृहकर्ज घेण्याचा विचार करत असणाऱ्या ग्राहकांसाठी सुद्धा SBI कडून आकर्षक व्याजदर आणि सोयीस्कर परतफेड योजना दिल्या जातात.

त्यामुळे SBI कडून गृहकर्ज घेणे अनेकांसाठी फायदेशीर ठरते. आता आपण एसबीआय बँकेचे होम लोनचे व्याजदर तसेच बँकेकडून तीस लाखांचे गृह कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार याचे एक कॅल्क्युलेशन थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

30 लाखांचे गृहकर्ज घेतल्यास कितीचा EMI ?

जर तुम्ही SBI कडून 30 लाख रुपयांचे गृहकर्ज 10 वर्षांसाठी (120 महिने) घेतले, तर EMI (मासिक हप्ता) किती असेल, हे व्याजदरावर अवलंबून असेल. सध्या SBI गृहकर्जावर सरासरी 8.50% वार्षिक व्याजदर लागू आहे. या व्याजदरावर EMI खालीलप्रमाणे असेल:
कर्ज रक्कम: ₹30,00,000
कर्ज मुदत: 10 वर्षे (120 महिने)
व्याजदर: 8.50% वार्षिक
EMI: ₹37,009 (अंदाजे)
एकूण परतफेड रक्कम: ₹44,41,080
व्याज रक्कम: ₹14,41,080

SBI गृहकर्जाचे फायदे

SBI गृहकर्जाचे अनेक फायदे आहेत, जे गृहखरेदीदारांसाठी उपयुक्त ठरू शकतात.
स्पर्धात्मक व्याजदर : इतर बँकांच्या तुलनेत SBI कडून गृहकर्जावर तुलनेने कमी व्याजदर आकारला जातो.
कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस लागत नाही : गृहकर्ज प्रक्रियेमध्ये कोणतेही हिडन चार्जेस नाहीत, त्यामुळे ग्राहकांना पारदर्शकता भेटते.
महिला अर्जदारांसाठी विशेष सवलत : महिला अर्जदारांना गृहकर्जावर अतिरिक्त सवलत मिळते.
लवचिक परतफेड पर्याय : ग्राहक त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार गृहकर्जाचा परतफेडीचा कालावधी निवडू शकतात.
कर लाभ : गृहकर्जावर प्राप्तिकर अधिनियमाच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा?

SBI गृहकर्जासाठी अर्ज करणे अगदी सोपे आहे. ग्राहक SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.onlinesbi.com) जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात, किंवा जवळच्या SBI शाखेत भेट देऊन कर्जाची प्रक्रिया सुरू करू शकतात.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, पॅन कार्ड (ओळख व पत्ता पुरावा)
उत्पन्नाचा पुरावा (सॅलरी स्लिप, IT रिटर्न्स)
मालमत्तेचे कागदपत्रे
बँक स्टेटमेंट (गेल्या 6 महिन्यांचे)

SBI गृहकर्ज घेणे फायदेशीर ठरू शकते, कारण यामध्ये कमी व्याजदर, लवचिक परतफेड पर्याय आणि कर सवलत यांसारखे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही 10 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले, तर सध्याच्या 8.50% वार्षिक व्याजदरानुसार तुमचा मासिक EMI सुमारे ₹37,009 रुपयांचा असेल. म्हणून जर तुमची स्वतःचे घर घेण्याची योजना असेल, तर SBI गृहकर्ज हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe