SBI Home Loan : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. देशात एकूण 12 सरकारी बँका आहेत. या बारा बँकांमध्ये एसबीआय सर्वात मोठी. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. यात होम लोन, पर्सनल लोन, गोल्ड लोन, बिझनेस लोन, एज्युकेशन लोन, क्रेडिट कार्ड लोन, एग्रीकल्चरल लोन अशा विविध कर्जांचा समावेश होतो.
दरम्यान जर तुम्ही एसबीआय कडून होम लोन अर्थातच गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर इतर बँकांची तुलना केली असता एसबीआय चे होम लोन परवडते.
अशा परिस्थितीत आज आपण एसबीआयच्या गृह कर्जाची माहिती जाणून घेणार आहोत. जसे की बँकेचे गृह कर्जाचे व्याजदर कसे आहेत, कमी इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज मिळवण्यासाठी किती सिबिल स्कोर हवा? अशा बाबी आज आपण पाहणार आहोत.
एसबीआय बँकेचे गृह कर्जाचे व्याजदर
मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना किमान 8.50% या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र या व्याजदराचा फायदा फक्त आणि फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच मिळणार आहे. 800 च्या आसपास ज्या लोकांचा सिबिल स्कोर आहे त्यांना बँकेकडून किमान 8.50% या व्याज दरावर गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
15 वर्षांसाठी 42 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले तर कितीचा हप्ता?
एसबीआय बँकेकडून जर एखाद्या ग्राहकाला 15 वर्ष कालावधीसाठी 8.50% या व्याजदरावर 42 लाख रुपयांचे गृह कर्ज मिळाले तर सदर ग्राहकाला 41 हजार 359 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच सदर कर्जदाराला कर्ज कालावधीमध्ये 74 लाख 44 हजार 620 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच सदर ग्राहकाला 32 लाख 44 हजार 620 रुपये फक्त व्याज म्हणून द्यावे लागतील.
मात्र यामध्ये बँकेकडून आकारले जाणारे विविध शुल्क समाविष्ट नाहीयेत. कोणतीही बँक होम लोन देताना प्रोसेसिंग फी सारखे वेगवेगळे शुल्क आकारत असते.
एसबीआय बँक देखील प्रोसेसिंग फी सारखे विविध शुल्क आकारते. यामुळे प्रत्यक्षात एखाद्याला ८.५०% इंटरेस्ट रेटवर 42 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले तर त्याला याहीपेक्षा अधिकची रक्कम बँकेत भरावी लागणार आहे.