SBI कडून 20 वर्ष कालावधीसाठी 55 लाखाचे Home Loan घेतले तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ? वाचा सविस्तर

खरं तर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे घर खरेदी करण्यासाठी अनेक जण गृह कर्जाचा पर्याय स्वीकारतात. मात्र गृह कर्ज घेताना विविध बँकांचे व्याजदर तपासूनच गृह कर्ज घेतले पाहिजे. ज्या बँका कमी व्याज दरात गृह कर्ज देतात नेहमी त्यांच्याकडूनच गृह कर्ज घ्यायला हवे.

Tejas B Shelar
Published:
SBI Home Loan News

SBI Home Loan News : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. एसबीआय आपल्या ग्राहकांना होम लोन देखील पुरवते. बँकेकडून परवडणाऱ्या व्याजदरात आपल्या ग्राहकांसाठी होम लोन ची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

महिलांसाठी बँकेकडून स्पेशल इंटरेस्ट रेट वर होम लोन पुरवले जाते. सणासुदीच्या काळात एसबीआय विशेष फेस्टिव सीजन ऑफर अंतर्गत आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात होम लोन पुरवते. दरम्यान, आज आपण एसबीआयच्या होम लोन ची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

खरं तर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे घर खरेदी करण्यासाठी अनेक जण गृह कर्जाचा पर्याय स्वीकारतात. मात्र गृह कर्ज घेताना विविध बँकांचे व्याजदर तपासूनच गृह कर्ज घेतले पाहिजे.

ज्या बँका कमी व्याज दरात गृह कर्ज देतात नेहमी त्यांच्याकडूनच गृह कर्ज घ्यायला हवे. दरम्यान जर तुम्हीही गृह कर्ज घेण्याचा तयारीत असाल तर गृह कर्ज घेण्याआधी आजचा हा लेख पूर्ण वाचा.

आज आपण एसबीआयच्या गृह कर्जाची माहिती पाहणार आहोत तसेच एसबीआयकडून जर 55 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले तर किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल या संदर्भातही आता आपण माहिती पाहणार आहोत.

एसबीआयच्या गृह कर्जाचे व्याजदर

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात मोठी बँक अर्थातच एसबीआय आपल्या ग्राहकांना 8.50% या किमान व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देते.

ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा लोकांना बँकेकडून या किमान व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. अर्थात ज्या लोकांचा सिबिल स्कोर स्ट्रॉंग आहे त्यांना एसबीआय कडून कमी इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज मिळते.

55 लाखांचे गृह कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागेल?

जर समजा एसबीआय कडून एखाद्या ग्राहकाला किमान 8.50% या व्याजदरात 55 लाख रुपयांचे गृह कर्ज 20 वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर अशा व्यक्तीला 47 हजार 730 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

अर्थातच या कालावधीत सदर कर्जदार व्यक्तीला एक कोटी 14 लाख 55 हजार दोनशे रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत. अर्थातच 59 लाख 55 हजार दोनशे रुपये निव्वळ व्याज म्हणून बँकेला द्यावे लागतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe