स्पेशल

SBI चा म्युच्युअल फंड ठरला कुबेरचा खजाना ! एका लाखाच्या गुंतवणुकीवर मिळालेत 1.32 कोटी; 5 हजाराच्या SIP ने सुद्धा लखपती बनवले ?

Published by
Tejas B Shelar

SBI Mutual Fund : एसबीआयचा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरला आहे. खरंतर म्युच्युअल फंडमध्ये केली जाणारी गुंतवणूक दीर्घ कालावधीत चांगला परतावा देते. एसबीआय लॉंग टर्म इक्विटी फंडने सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

एसबीआय ची ही म्युच्युअल फंडाची योजना 32 वर्षांपूर्वी सुरू झाली आणि जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतोय.

गेल्या पाच वर्षांचा विचार केला असता गेल्या पाच वर्षांमध्येही या योजनेने गुंतवणूकदारांना चांगला बेनिफिट दिला असून टॉप तीन म्युच्युअल फंडात एसबीआयच्या या फंडाचा देखील समावेश होतो. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणुकीतून चांगला फायदा झाला आहे.

एसआयपी करूनही गुंतवणूकदारांनी यातून चांगला नफा मिळवलाय. एसबीआय लॉन्ग टर्म इक्विटी फंड 1993 मध्ये सुरू झाले. आता येत्या काही दिवसांनी या फंडला 32 वर्षांचा काळ पूर्ण होणार आहे. 31 मार्च 2025 ला हा फंड सुरू होऊन 32 वर्षांचा काळ पूर्ण होणार आहे.

दरम्यान आज आपण ज्या गुंतवणूकदारांनी हा म्युच्युअल फंड लॉन्च होताना एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल त्यांना आता किती रिटर्न मिळाले आहेत, तसेच पाच वर्षांपूर्वी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या म्युच्युअल फंड मधून काय रिटर्न मिळालेत याबाबत आढावा घेणार आहोत.

1 लाखाची Lumpsum गुंतवणूक करणाऱ्यांना मिळाला कोटींचे रिटर्न

ज्या गुंतवणूकदाराने 31 मार्च 1993 रोजी म्हणजेच हा फंड सुरू झाला त्या दिवशी यामध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल अन ही गुंतवणूक आत्तापर्यंत होल्ड करून ठेवली असेल तर त्यांना या फंडातून एक कोटी 32 लाख 27 हजार 750 रुपये मिळाले आहेत.

अर्थातच गुंतवणुकीचे एक लाख रुपये वजा करता गुंतवणूकदाराला एक कोटी 31 लाख 27 हजार 750 रुपये रिटर्न मिळाले आहेत. म्हणजेच ही योजना सुरू झाल्यापासून यातून गुंतवणूकदारांना 16.62% दराने वार्षिक परतावा मिळाला आहे.

तसेच ज्या लोकांनी पाच वर्षांपूर्वी या योजनेत एक लाख रुपयांची एक रकमी गुंतवणूक केली असेल त्यांना देखील आत्तापर्यंत 2,97,870 रुपयांचा परतावा मिळाला आहे. या काळात गुंतवणूकदारांना 24.37% दराने वार्षिक परतावा मिळाला आहे.

तसेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत 17 वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक आणि दरमहा पाच हजार रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर त्याचे सध्याचे फंडाचे मूल्य 52 लाख रुपये एवढे झाले असते. कारण गेल्या 17 वर्षांत या योजनेने गुंतवणूकदारांना वार्षिक 14.87% दराने परतावा दिला आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar