SBI Vs PNB FD Scheme : जेव्हा-जेव्हा बचतीची चर्चा होते तेव्हा-तेव्हा फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेचे नाव आपल्या ओठांवर येते. मुदत ठेव योजना हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित प्रकार मानला जातो. त्यामुळे महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक फिक्स डिपॉझिट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात.
दरम्यान, जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण देशातील दोन प्रमुख बँकांच्या मुदत ठेव योजनेची तुलना करणार आहोत.
खरेतर फिक्स डिपॉझिट मध्ये केलेली तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तुम्हाला खात्रीशीर परतावाही मिळतो. दरम्यान आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक या दोन्ही बँकांच्या एका वर्षाच्या एफडी योजनेची तुलना करणार आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. तसेच पंजाब नॅशनल बँक ही देखील देशातील एक महत्त्वाची बँक आहे. आता आपण या दोन्ही बँकांच्या एफ डी व्याजदराची तुलना करूयात.
SBI चे FD दर कसे आहेत?
7 ते 45 दिवस – 3.5 टक्के
46 ते 179 दिवस – 5.5 टक्के
180 ते 210 दिवस – 6.25 टक्के
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 6.5 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 6.8 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – 7 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षे 5 वर्षे ते 10 वर्षे कमी – 6.75 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे – 6.5 टक्के
पीएनबीचे एफडी दर कसे आहेत?
7 ते 14 दिवस – 3.5 टक्के
15 ते 29 दिवस – 3.5 टक्के
30 ते 45 दिवस – 3.5 टक्के
46 ते 60 दिवस – 4.5 टक्के
61 ते 90 दिवस – 4.5 टक्के
91 ते 179 दिवस – 5.5 टक्के
180 ते 270 दिवस – 6.25 टक्के
271 ते 299 दिवस – 6.5 टक्के
300 दिवस – 7.05 टक्के
301 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 6.50 टक्के
1 वर्ष – 6.80 टक्के
एसबीआय अन PNB मध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?
SBI आणि PNB या दोन्ही बँकांमध्ये सामान्य ग्राहकांना एका वर्षाच्या मुदत ठेवींवर 6.80 टक्के व्याज मिळत आहे. जर तुम्ही एका वर्षासाठी 5 लाख रुपयांची एफडी केली असेल, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 5,34,877 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला व्याजातून 34,877 रुपये मिळतील.