स्पेशल

Sea Snake Information: सर्व समुद्रीसर्प असतात विषारी! राहतात 300 फूट खोल समुद्रात, वाचा समुद्र सापांची वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

Sea Snake Information:- सापांच्या विविध प्रजाती आहेत व या प्रत्येक प्रजातीचे त्यांचे त्यांचे वैशिष्ट्ये देखील आहेत. जगाच्या पाठीवर जितक्या सापांच्या प्रजाती आहेत त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्याच प्रजाती या विषारी आहेत. सापांच्या प्रजातींमध्ये विषारी, निमविषारी आणि बिनविषारी असे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात.

यासंबंधीची बरीचशी माहिती आपण अनेक लेखांच्या माध्यमातून घेत आहोत. या सापांच्या प्रजातीमध्ये जर आपण विचार केला तर समुद्री सर्प अथवा समुद्री साप ही एक सापाची प्रजात असून तिचे वैशिष्ट्य इतर जातीपेक्षा खूप वेगळे आहेत. समुद्रातील जेवढ्या सापाच्या जाती आहेत तेवढ्या प्रामुख्याने विषारी असतात परंतु दुसरी एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे इतर विषारी सापांप्रमाणे ते आक्रमक होत नाहीत किंवा ते आक्रमक नसतात. या व असे अनेक वैशिष्ट्य आपल्याला समुद्री साप या प्रजातीमध्ये दिसून येतात.

 समुद्री सापांविषयी महत्त्वाची माहिती

समुद्री सापांचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यांचे जीवन संपूर्णपणे पाण्यात असते व ते मांसाहारी असतात. विशेष म्हणजे या प्रजातीचे साप हे समुद्रातच नाहीत तर नद्यांमध्ये देखील येतात. बऱ्याचदा ते समुद्र किंवा नदी किंवा खाड्यांमधून जमिनीवर देखील विहार करतात व त्या ठिकाणी ते सुस्तपणे सरपटतात.

जर जमिनीवर वावर असणाऱ्या सापांच्या प्रजातीच्या तुलनेमध्ये समुद्री सापाची शरीररचना पाहिली तर त्यांची शेपटी चपटी असते व तिचा वापर ते पोहण्याकरिता एखाद्या वल्ह्याप्रमाणे करतात. तसेच जेव्हा पाण्यात असताना ते श्वास घेतात त्याकरिता ते पाण्याच्या पृष्ठभागावर त्यांच्या नाकपुड्या आणतात.

विशेष म्हणजे त्यांच्या नाकपुड्या या चेहऱ्याच्या टोकावर असल्यामुळे त्यांना पाण्याच्या बाहेर थोडेसे नाक काढून देखील श्वास घेता येतो. समुद्री सापांचे वैशिष्ट्य म्हणजे ते भक्षाच्या शोधासाठी अगदी समुद्राच्या तळाशी देखील जातात व तसेच हवेसाठी ते पाण्याच्या वरती देखील येतात. या दोन्ही बाबींकरिता समुद्रातील साप 300 फूट खोल देखील समुद्रात राहतात. तसेच समुद्री सापांची अंतर्गत शरीर रचना पाहिली तर त्यांना एकच लांब उजवे फुफ्फुस असते व ते त्याच्या शेपटीपर्यंत पसरलेले असते.

या जातीच्या सापांना डावे फुफ्फुस असते परंतु ते खुरटलेले असते. समुद्री साप हे फुफुसाचा जो काही नाकाकडील भाग असतो त्या माध्यमातून हवेची देवाण-घेवाण करतात. या सापांच्या शेपटीकडील भागातील जी काही हवा असते ती त्यांच्या शरीर पाण्यात राहण्यासाठी मदत करते. तसेच समुद्री सापांच्या जातीच्या मादीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या फलित अंडी शरीरात साठवून कालांतराने पिलांना जन्म देतात. तसेच समुद्रातील सर्व सापांच्या जाती या विषारी असतात.

परंतु जमिनीवर राहणाऱ्या सापांच्या विषारी जातीइतके ते आक्रमक नसतात. जर आपण समुद्रातील सापांचे विषाचे दात पाहिले तर ते लहान असतात. जर समुद्री साप चावला तर मात्र पटकन वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. समुद्री साप चावल्यामुळे जर जास्त प्रमाणात विष शरीरात भिनले गेले असेल तर त्याचा परिणाम श्वास पटल आणि स्नायूवर होतो व ते काम करणे बंद करतात. तसेच हृदयाच्या स्नायूंचे कार्य देखील मंदावते व हृदय बंद पडण्याची शक्यता असते.

समुद्री सापांचे महत्त्वाचे खाद्य हे खेकडे आहे. भारताच्या समुद्रकिनाऱ्यांमध्ये समुद्री सापाची चोचवाला सागरी साप ही प्रजात मोठ्या प्रमाणावर आढळते. समुद्रातील साप चावल्यामुळे जे मृत्यू होतात त्यापैकी अर्धे मृत्यू हे चोचवाला सागरी साप चावल्यामुळे होतात. तसे पाहायला गेले तर समुद्री साप chaवण्याची शक्यता खूप कमी असते. विशेष म्हणजे पूर्वेकडील जे देश आहेत त्या ठिकाणी समुद्री साप आवडीने खाल्ले जातात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil