स्पेशल

‘हा’ शेअर ठरला कुबेरचा खजाना ! फक्त 8 वर्षात 1 लाखाचे झालेत 3 कोटी 70 लाख, पहा कोणता आहे तो बाहुबली स्टॉक?

Share Market 2023 : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. खर पाहता, शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करण्यावर अनेक गुंतवणूकदार भर देत असतात. लॉंगटर्म मधील गुंतवणूक निश्चितच गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर व्यवहार सिद्ध होत आहे.

लॉंगटर्म मध्ये भरपूर रिटर्न देणारे अनेक शेअर आपण पाहिले असतील, त्याविषयी ऐकले असेल किंवा एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करून आपण चांगले रिटर्न देखील मिळवले असतील. Long term मध्ये अनेक शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा परतावा देऊन मालामाल करून सोडले आहे. पण आज आपण अशा एका शेअरची माहिती जाणून घेणार आहोत ज्या शेअरने 8 वर्षात एका लाखाचे तब्बल 3 कोटी 70 लाख बनवले आहेत.

हे पण वाचा :- पुणे, अहमदनगर, नागपूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड अन ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! IMDचा येलो अलर्ट

कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही मात्र हे खरे आहे. स्पेशलिटी केमिकल इंडस्ट्रीची कंपनी असलेल्या ज्योती रेजिन्स अ‍ॅण्ड अ‍ॅडहेसिव्हजच्या स्टॉकने हा भीम पराक्रम करून दाखवला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या कंपनीचा शेअर 2015 मध्ये अवघा चार रुपयाला होता. मात्र आता या शेअरची किंमत 1500 रुपयांपेक्षा अधिक आहे.

म्हणजेच या 8 वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 37 हजार टक्के रिटर्न देण्याची अभूतपूर्व किमया साधली आहे. यामुळे या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार या गेल्या 8 वर्षातच लखपतीचे करोडपती बनले आहेत एवढे नक्की. मिळालेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल 2015 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर या कंपनीचा शेअर चार रुपये आणि 12 पैशावर ट्रेड करत होता.

हे पण वाचा :- भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती, असा करा अर्ज

तर 21 एप्रिल 2023 रोजी हाच स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर तब्बल 1560 रुपये आणि 30 पैशांवर ट्रेड करत होता. अर्थातच ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 2015 मध्ये मात्र एक लाख रुपये गुंतवणूक केली असेल आणि ही गुंतवणूक आठ वर्ष तशीच होल्ड करून ठेवली असेल तर त्या गुंतवणूकदारांना 2023 मध्ये म्हणजेच या चालू वर्षात तब्बल तीन कोटी 78 लाखांपर्यंतचा परतावा मिळाला असेल.

निश्चितच या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या काही वर्षात कोट्यावधी रुपयांचा परतावा देऊन मालामाल केले आहे यात शँकाच नाही. मित्रांनो, शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीम पूर्ण असते. यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराशी चर्चा करणे आवश्यक आहे. इथे दिलेली माहिती ही गुंतवणूक करण्याचा सल्ला नव्हे याची काळजी मात्र घ्यायची आहे. 

हे पण वाचा :- कोरोनात नोकरीं गेली सुरु केली शेती ! 30 गुंठ्यात ‘या’ पिकाची लागवड केली अन झाली 10 लाखाची कमाई, वाचा ही यशोगाथा

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts