स्पेशल

गुंतवणूकदारांसाठी ‘हा’ स्टॉक ठरला कुबेर का खजाना ! फक्त 6 महिन्यात 2 लाखाचे बनवलेत 30 लाख, पहा….

Published by
Ajay Patil

Share Market : शेअर बाजार हे जोखीम पूर्ण क्षेत्र आहे. मात्र यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. कारण की, शेअर बाजारातील काही स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीतच जोरदार परतावा देत आहेत. दरम्यान शेअर बाजारातून गुंतवणूकदारांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत एका स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. विशेष म्हणजे हा स्टॉक अतिशय कमी किमतीचा आहे.

मात्र पाच रुपयाच्या या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना अवघ्या सहा महिन्यात जोरदार परतावा देण्याची किमया साधली आहे. या stock ने मात्र सहा महिन्याच्या कालावधीत दोन लाखाचे तीस लाख करून दाखवले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका हा पेनी स्टॉक आहे तरी कोणता चला तर मग जाणून घेऊया या स्टॉक संदर्भात आवश्यक सर्व माहिती.

हे पण वाचा :- कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री शिंदे घेणार मोठा निर्णय; ‘या’ दिवशी महागाई भत्त्यात होणार 4% वाढ, तारीख झाली फिक्स, पहा….

कोणता आहे हा स्टॉक

हा स्टॉक आहे ग्लोब कमर्शियल कंपनीचा. खरं पाहता ही कंपनी अॅग्रीकल्चर कमोडिटीज आणि ई-कॉमर्स सोल्यूशन्समध्ये व्यवहार करत आहे. याच कंपनीच्या स्टॉकने गेल्या सहा महिन्यात जोरदार परतावा दिला आहे. या कंपनीचे शेअर सहा महिन्यात पाच रुपयांवरून चक्क 39 रुपयांवर पोहोचले आहेत. विशेष बाब म्हणजे या कंपनीने त्यांच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देखील दिले आहेत.

हे पण वाचा :- कौतुकास्पद ! पती निधनानंतर खचून न जाता शेती सांभाळली; सफरचंदाच्या लागवडीतून झाली लाखोंची कमाई, पहा….

म्हणजे जर सहा महिन्यांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपयांचे शेअर या कंपनीचे घेतले असतील तर त्यांना एक लाखाचे 20 हजार शेअर मिळाले असतील आणि वीस हजार बोनस शेअर मिळाले असतील. म्हणजे त्या गुंतवणूकदाराकडे एकूण 40 हजार शेअर्स बनतात. आता म्हणजे 12 एप्रिल 2023 पर्यंत या शेअरची किंमत 39 रुपये आहे.

म्हणजे या चाळीस हजार शेअरची एकूण किंमत 15 लाख 60 हजार बनते. एकंदरीत एक लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या शेअर्समधून 15 लाख 60 हजार रुपये आणि दोन लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या शेअर मधून 31 लाख 20 हजार रुपये मिळाले असतील. 

हे पण वाचा :- पंजाबरावांचा हवामान अंदाज; आजपासून ‘या’ भागात पडणार अवकाळी पाऊस !

Ajay Patil

Published by
Ajay Patil