स्पेशल

दीर्घ कालावधीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम आहेत ‘ही’ 5 शेअर्स! देतील भरघोस परतावा? वाचा काय म्हणतात तज्ञ?

Published by
Ajay Patil

सध्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याचे आपल्याला दिसून येते व यामध्ये काही व्यक्ती अल्प कालावधीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करतात तर काहीजण दीर्घ कालावधीसाठी शेअर्स बाजारात गुंतवणूक करतात.

शेअर्स खरेदी करताना मात्र कोणता शेअर्स खरेदी करावा किंवा अल्प कालावधीसाठी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी आणि दीर्घ कालावधीसाठी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी?

याबाबत मात्र बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. जर तुम्हाला देखील दीर्घ कालावधीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर ब्रोकरेज हाऊस शेअर  खानने दीर्घ कालावधीसाठी काही मजबूत फंडामेंटल असलेल्या पाच दर्जेदार स्टॉक्स मध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ते नेमके कोणते शेअर्स आहेत? त्याबद्दलची माहिती आपण बघू.

 ब्रोकरेज हाऊस शेअर खानने दिला आहे दीर्घ कालावधीसाठी ही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला

1- ज्योती लॅब्स शेअर खानने ज्योती लॅब्सवर खरेदीचा सल्ला दिला असून प्रति शेयर लक्ष्य 655 ठेवण्यात आले आहे. जर आपण 26 जुलै 2024 रोजी या शेअरची किंमत पाहिली तर ती पाचशे पन्नास रुपये होती. अशाप्रकारे गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीपेक्षा 19 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

2- महिंद्रा लॉजिस्टिक तसेच या ब्रोकरेज हाऊसने महिंद्रा लॉजिस्टिक्स वर देखील खरेदीचा सल्ला दिला असून याची टारगेट प्राईस 632 रुपये ठेवण्यात आली आहे. २६ जुलै रोजीची या शेअरची प्राईस पाहिली तर ती 537 रुपये होती. टारगेट प्रमाणे पाहिले तर सध्याच्या किमतीपेक्षा गुंतवणूकदारांना हा 18% पर्यंत परतावा देऊ शकतो.

3- एशियन पेंट्स शेअर खानने एशियन पेंट वर देखील खरेदीचा सल्ला दिला असून यासाठीचे टार्गेट प्राईस 3385 रुपये प्रति शेअर अशी ठेवण्यात आलेली आहे. 26 जुलै 2023 रोजी या शेअरची प्राईस 2948 रुपये होती. दिलेल्या टार्गेट नुसार पाहिले तर सध्याच्या किमतीपेक्षा गुंतवणूकदारांना या माध्यमातून 15 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

4- आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ शेअर खानाने आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफवर देखील खरेदीचा सल्ला दिला असून याकरिता टारगेट प्राईज आठशे रुपये ठेवण्यात आली आहे. 26 जुलै 2024 रोजी हा शेअर 724 रुपये इतका होता व अशा प्रकारे जर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली तर टार्गेटनुसार सध्याच्या किमतीपेक्षा ११ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

5- कोल इंडिया शेअरखान यांनी कोल इंडिया वर देखील खरेदीचा सल्ला दिला असून त्याकरिता प्रति शेअर टार्गेट प्राईज 550 रुपये ठेवण्यात आले असून 26 जुलै रोजी या शेअरची प्राईस पाचशे आठ रुपये होती. अशाप्रकारे जर गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली तर सध्याच्या किमतीपेक्षा टार्गेट प्राईज नुसार 9% पर्यंत परतावा मिळू शकतो.

( गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Ajay Patil