Share Market News : भारतीय शेअर बाजारात केल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार पाहायला मिळतोय. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरन झाली असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
पण शेअर बाजारात घसरण सुरु असली तरी काही स्टॉक्स आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसतील असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त होतोय. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने गुंतवणूकदारांना असे तीन शेअर सुचवले आहेत ज्यातून त्यांना चांगली कमाई करता येणार आहे.
हे तीन स्टॉक आगामी काळात फोकस मध्ये राहतील आणि यातून गुंतवणूकदारांना चांगला मोठा परतावा मिळण्याची आशा सदर ब्रोकरेज फर्म कडून व्यक्त करण्यात आली आहे. अशा स्थितीत आज आपण हे तीन स्टॉक नेमके कोणते आहेत आणि या स्टॉक साठी टारगेट प्राईज काय निश्चित करण्यात आली आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
LTI Mindtree : मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एलटीआय माईंडट्री लिमिटेड कंपनीच्या शेअरवर विश्वास दाखवला आहे. या शेअरसाठी ब्रोकरेज फर्म कडून बाय रेटिंग देण्यात आली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.
फर्मने या शेअरसाठी 8,000 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. सध्या एलटीआय माईडट्री शेअर 5,975 रुपयांवर ट्रेड करतोय. अर्थातच ही टार्गेट प्राईस शेअरच्या सध्याच्या किमतीपेक्षा 33.52 टक्क्यांनी अधिक आहे.
या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना आगामी काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे हा स्टॉक आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहील.
BEL : मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड शेअरसाठी सुद्धा बाय रेटिंग जाहीर केली आहे. तसेच यासाठी 360 टारगेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे. सध्या हा शेअर शेअर बाजारात 270.30 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच टारगेट प्राईज ही सध्याच्या किमतीपेक्षा 33 टक्क्यांनी अधिक असून जर खरंच यामध्ये 33 टक्क्यांनी वाढ झाली तर हा स्टॉक खरेदी करणाऱ्यांना आगामी काळात चांगला फायदा होताना दिसणार आहे.
Anant Raj : हा सुद्धा स्टॉक आगामी काळात चांगली कामगिरी करताना दिसेल असे मत मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने व्यक्त केले असून अनंत राज लिमिटेड शेअरसाठी ब्रोकरेज फर्म कडून बाय रेटिंग देण्यात आली आहे.
यासाठी 1100 रुपये टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली असून सध्या हा शेअर 806.95 रुपयांवर ट्रेड करतोय. म्हणजे या शेअर साठी देण्यात आलेली टार्गेट प्राईस सध्याच्या किमतीपेक्षा 36 टक्क्यांनी अधिक आहे. नक्कीच या स्टॉकची कामगिरी ब्रोकरेज फर्मने सांगितल्याप्रमाणे राहिली तर याचा गुंतवणूकदारांना आगामी काळात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.