स्पेशल

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चांदी होणार ! एनटीपीसी शेअरची प्राईस 36 टक्के वाढणार, टार्गेट प्राईस आताच नोट करा

Published by
Tejas B Shelar

Share Market News : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. खरे तर नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळतोय. नवीन वर्षाचे सुरुवातीचे दोन दिवस शेअर बाजार तेजीत राहिला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये सुरुवातीचे दोन दिवस तेजी पाहायला मिळाली मात्र नंतर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली.

दरम्यान, या शेअर बाजारातील चढ उताराच्या काळात एनटीपीसी शेअर आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. काल शुक्रवार 24 जानेवारी 2025 रोजी एनटीपीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये थोडी तेजी दिसून आली अन पुढील काही दिवस या स्टॉक मध्ये तेजीच राहणार असे म्हटले जात आहे.

दरम्यान आज 25 जानेवारी 2025 रोजी एनटीपीसी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाकडून चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले जाणार अशी माहिती समोर आली आहे. तसेच कंपनी गुंतवणूकदारांना डिव्हीडंड देण्याची घोषणा सुद्धा करू शकते, असा मोठा दावा केला जात आहे.

दरम्यान, या स्टॉकची किंमत आगामी काळात आणखी वाढणार असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत, आज आपण या स्टॉकची गेल्या काही वर्षांमधील कामगिरी जाणून घेणार आहोत तसेच या स्टॉकची प्राईस किती वाढणार ? यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एनटीपीसी लिमिटेड कंपनीची कामगिरी कशी आहे ?

मित्रांनो, 05 नोव्हेंबर 2004 ला एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 62.96 रुपये एवढी होती. या स्टॉकच्या सध्याच्या कामगिरी बाबत बोलायचं झालं तर सध्या हा शेअर 324.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. हा शेअर गुरुवारी 323.65 रुपये क्लोज झाला.

गुरुवारी दिवसभरात हा स्टॉक 322.20 रुपये ते 329.90 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एका वर्षाच्या कामगिरी बाबत बोलायचं झालं तर हा शेअर 296.85 रुपये ते 448.45 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.

आता आपण मागील 5 वर्षात या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे? या स्टॉकच्या मागील पाच वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत. मित्रांनो अलीकडील काही दिवसांमध्ये या स्टॉकची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

मागील ५ दिवसात एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा शेअर शेअर बाजारात 1.10% घसरलाय. तसेच, मागील एका महिन्यात हा शेअर 3.12% घसरला आहे. तसेच मागील ६ महिन्याच्या काळात सुद्धा या शेअरने गुंतवणूकदारांना दणका दिलाय, गेल्या 6 महिन्यात हा शेअर 17.26% घसरला आहे.

पण मागील १ वर्षात एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरने 5.20 टक्के परतावा दिला आहे. तसेच, गेल्या ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 183.14 टक्के परतावा दिला आहे. शिवाय लॉन्ग टर्ममध्ये या शेअरची कामगिरी गुंतवणूकदारांसाठी फायद्याची राहिली आहे.

लॉन्ग टर्म मध्ये या स्टॉकने 415.96 टक्के एवढा परतावा दिला आहे. मात्र, YTD आधारावर एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 2.64% घसरला आहे. दरम्यान आता ब्रोकरेज फर्मने या शेअरच्या किंमतीत पुढील काळात तेजी पाहायला मिळू शकते असा विश्वास व्यक्त केलाय.

एनटीपीसी शेअरमध्ये आगामी काळात ३६.३ टक्के तेजीचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षभरात एनटीपीसी शेअरची प्राईस ४४१ रुपयांपर्यंत जाऊ शकते असे ब्रोकरेज फर्मने सांगितले आहे. एनटीपीसी कंपनी शेअरची टार्गेट प्राईस 441 रूपये एवढी आहे.

महत्वाची बाब म्हणजे जवळपास २३ विश्लेषकांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिलाय म्हणजेच ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. अर्थातच आगामी काळात हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असून यातून गुंतवणूकदारांना चांगली कमाई होणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com