Share Market Tips : शेअर बाजारात लाखो लोक गुंतवणूक करतात. स्टॉक मार्केट मधील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. पण स्टॉक मार्केटमध्ये अनेक स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील देत असतात.
दरम्यान आज आपण अशा एका स्टॉक संदर्भात जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना तीन वर्षाच्या काळात करोडो रुपयांचा परतावा मिळवून दिला आहे. शेअर बाजारात चढ-उतार सुरू असतानाच या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची किमया साधली आहे.
आज आपण ज्या स्टॉक संदर्भात जाणून घेणार आहोत तो स्टॉक तीन वर्षांपूर्वी फक्त 28 रुपयांवर ट्रेड करत होता. पण सध्या हा स्टॉक 356 रुपयांवर ट्रेड करत असून या स्टॉक या तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. निश्चितच आता तुम्हाला या स्टॉक संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या स्टॉक संदर्भात सर्व आवश्यक माहिती अगदी थोडक्यात.
कोणता आहे तो स्टॉक?
हा शेअर आहे जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेडचा. हा स्मॉल कॅपिटल कंपनीचा स्टॉक मे 2020 मध्ये 28 रुपये आणि 75 पैशांवर ट्रेड करत होता. आता मे 2023 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर हा स्टॉक 356 रुपये आणि 50 पैशांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच तीन वर्षाच्या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1100 टक्क्याचा परतावा देण्याची किमया साधली आहे.
जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी जेनेसिस इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवली असेल आणि आतापर्यंत ही गुंतवणूक होल्ड करून ठेवली असेल तर अशा गुंतवणूकदाराचे एका लाखाचे बारा लाख 40 हजार रुपये बनले असतील.
पण हा स्टॉक एका वर्षामध्ये २३.६९ टक्क्यांनी कोसळला आहे. तर या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यामध्ये २२.६४ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या एका महिन्याचा विचार केल्यास हा शेअर १३.६१ टक्क्यांनी वधारला आहे. एकंदरीत गेल्या तीन वर्षांच्या काळात या स्टॉकने चांगली कामगिरी केली आहे.
मित्रांनो येथे दिलेली माहिती ही केवळ स्टॉकच्या परफॉर्मन्स संदर्भात असते. हा कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला नाही याची नोंद घ्यायची आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ शाळांचे वेळापत्रक बदलणार, 2 सत्रात भरणार शाळा; मंत्री गावित यांची माहिती