स्पेशल

गुंतवणूकदारांची झाली चांदी! ‘हा’ 294 रुपयाचा शेअर आता 3 हजारावर करतोय ट्रेड, फक्त 3 वर्षात केला कारनामा; पहा कोणता आहे तो स्टॉक

Share Market Tips : जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास आहे. खरं पाहता शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट पूर्णपणे जोखीमपूर्ण क्षेत्र आहे. मात्र असे असले तरी अनेकजण यात गुंतवणूक करतात.

अनेक गुंतवणूकदार यामध्ये लॉन्ग टर्म साठी गुंतवणूक करतात. असं सांगितलं जातं की अधिक कालावधीसाठी म्हणजेच लॉन्ग टर्म मध्ये एखाद्या चांगल्या शेअर मध्ये गुंतवणूक केली तर तेथून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते.

मात्र आज आपण अशा एका शेअरविषयी जाणून घेणार आहोत ज्याने तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करून सोडले आहे. मात्र तीन वर्षात एका कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 929% चा परतावा देऊ केला आहे.

आता तुम्हाला निश्चितच या मल्टिबॅगर स्टॉक संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असेल. अशा परिस्थितीत आपण आता अधिक उशीर न करता सरळ मुद्द्यावर हात घालूया आणि या स्टॉक संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा तपशीलवार प्रयत्न करूया.

हे पण वाचा :- ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विद्यापीठात निघाली भरती, 35 हजार रुपये पगार मिळणार, वाचा….

कोणता आहे तो स्टॉक?

अपार इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा हा स्टॉक आहे. ही एक पावर सेक्टर मधील कंपनी असून या कंपनीने गेल्या तीन वर्षात चांगली जोरदार कामगिरी केली आहे. खरं पाहता हा अपार इंडस्ट्रीज लिमिटेड चा स्टॉक तीन वर्षांपूर्वी मात्र 294 रुपयावर ट्रेड करत होता.

आता तीन वर्षानंतर हा स्टॉक तीन हजार रुपयांवर ट्रेड करत आहे. अर्थातच ज्यांनी तीन वर्षांपूर्वी या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली असेल आणि आपली रक्कम होल्ड करून ठेवली असेल तर अशा गुंतवणूकदारांना निश्चितच लाखो रुपयांचा नफा या स्टॉक मधून मिळाला असेल.

हे पण वाचा :- नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता सिडको Navi Mumbai मध्ये निओ मेट्रो सुरु करणार, कसा राहणार रूट, पहा…..

दहा लाखाचे बनलेत एक कोटी

या शेअरने गेल्या तीन वर्षांपासून चांगली जोमदार कामगिरी केली असून जवळपास 929% परतावा आपल्या गुंतवणूकदारांना देण्याची किमया साधली आहे. निश्चितच या कंपनीने केलेला हा भीम पराक्रम या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मालामाल करून गेला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी या स्टॉक मध्ये दहा लाख रुपये इन्वेस्ट करून ती रक्कम होल्ड करून ठेवली असेल तर आजमितिला या स्टॉक मधून सदर गुंतवणूकदाराला एक कोटी रुपयांचा परतावा मिळणार आहे. 

मित्रांनो, येथे दिलेली माहिती ही स्टॉकच्या परफॉर्मन्स संदर्भात असते. स्टॉक मार्केटमध्ये कोणता स्टॉक चांगला परफॉर्म करत आहे याची माहिती आपल्या वाचक मित्रांना व्हावी या अनुषंगाने आम्ही ही माहिती देत असतो.

यामुळे इथे दिलेल्या माहितीवर कोणत्याही स्टॉक मध्ये गुंतवणूक करणे निव्वळ जोखीमीचे राहणार आहे. म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे जरुरीचे आहे. येथे दिलेली माहिती ही कोणत्याही गुंतवणुकीसाठीचा सल्ला नाही याची नोंद मात्र वाचकांनी घ्यायची आहे. 

हे पण वाचा :- महाराष्ट्रात रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 3190 जागांसाठी निघाली भरती, 10वी आणि 12वी पास उमेदवार राहणार पात्र, वाचा….

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts