स्पेशल

शिखाने शोधला शेती कचऱ्यापासून पैसा कमावण्याचा मार्ग आणि उभारली करोडोंची कंपनी! जाणून घ्या नेमके काय केले या तरुणीने?

Published by
Ahmednagarlive24 Office

Business Success Story :- व्यक्तीमध्ये जर प्रयोगशीलता आणि कल्पकता गुण असतील तर असे व्यक्ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी ठरताना आपल्याला दिसून येतात. पैसा कमावण्याच्या बाबतीत हे व्यक्ती नक्की इतरांपेक्षा ते पुढे असतात. कारण त्यांच्यामध्ये कल्पकता हा गुण खूप महत्त्वाचा असतो व ते त्यांच्या कल्पकतेने कोणत्याही क्षेत्रातून चांगल्या पद्धतीने पैसा मिळवू शकतात.

नेमकी एखाद्या गोष्टी मधून संधी शोधून त्या संधीचे सोने करणे किंवा त्या संधीचे व्यवसायात रूपांतर करण्याची कला देखील खूप महत्त्वाचे असते. असेच काहीसे गुण आपल्याला अहमदाबादच्या शिखा शाहमध्ये दिसून येतात. कारण या तरुणीने शेतीमध्ये उपलब्ध होणाऱ्या कचऱ्यापासून व्यवसाय करण्याची कल्पना शोधली व आज त्या अल्टमॅट(Altmat) नावाच्या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

शिखा यांची ही कंपनी शेतीमधून मिळणाऱ्या कचऱ्यापासून कपडे बनवते व त्यांच्या या फायबर ब्रँडचे नाव आहे अल्टमॅट होय. शिखा यांची कंपनी शेतकऱ्यांकडून शेतीमध्ये उपलब्ध होणारा कचऱ्याची खरेदी करते व प्रत्येक वर्षाला साधारणपणे 30 कोटी रुपयांचे पर्यावरण पूरक फायबरचे उत्पादन करते. नेमकी शेती कचऱ्यापासून कशी सुचली व्यवसायाची कल्पना? इत्यादी बाबत आपण शिखा यांची यशोगाथा समजून घेऊ.

वडिलांकडून मिळाले होते कचरा व्यवस्थापनाचे धडे

शिखा यांचे वडील विष्णू शहा हे ऑटोमोबाईल कचऱ्यापासून धातू बनवण्याचा व्यवसाय करायचे व त्यामुळे शिखा यांना लहानपणापासून कचऱ्यापासून वस्तू बनवणे माहिती होते. जेव्हा त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी व्यावसायिक शिक्षण घ्यायचे ठरवले व ते निरमा विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील बॅबसन विद्यापीठातून उद्योजकता आणि नेतृत्व या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

अशाप्रकारे सुरू केली कंपनी

2019 यावर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये शिखा यांनी अल्टमॅट लॉन्च केले व यामध्ये वडिलांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले. जवळपास 57% कपडे पॉलिस्टरचे असतात व प्रत्येक वेळी ते जेव्हा धुतले जातात तेव्हा त्यातून मायक्रो प्लास्टिक बाहेर पडतात व हे मायक्रो प्लास्टिक मानवी आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

तसेच जगातील 24 टक्के कीटकनाशकांचा वापर हा 2.4% शेत जमिनीवर कापूस पिकवण्यासाठी केला जातो व जीन्सच्या तीन जोड्या बनवण्यासाठी 20000 लिटर पाणी लागू शकते हे सगळे शिखा यांना माहिती होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना पर्याय मिळावा याकरिता त्यांनी या कंपनीची सुरुवात केली व त्यांची ही कंपनी आता एका वर्षात 40 लाख कपडे म्हणजे शर्ट किंवा टी-शर्ट बनवण्याकरिता आवश्यक असलेले फायबर तयार करते व यातून वर्षाला साधारणपणे 1000 टन फायबर निर्मिती होते.सध्या शिखा यांच्या कंपनीने 11 मोठ्या ब्रँड हाऊसची करार केले असून कंपनी वेगात आता विकसित होत आहे.

शेतकऱ्याकडून ही कंपनी कृषी कचरा खरेदी करते. यामध्ये शेतामध्ये जे काही गवत असते त्याचे कापसासारख्या स्वरूपामध्ये रूपांतर केले जाते व त्यापासून सूत तयार केले जाते. या सुतापासून पिशव्या आणि शूज तसेच घराच्या सजावटीच्या वस्तू यापासून बनवल्या जातात. विशेष म्हणजे या गवतापासून जे काही फायबर बनवले जाते त्यापासून कापूस आणि तागाच्या कापडासारखे कापड मिळते व विशेष म्हणजे ते स्वस्तात मिळते.

सध्या शिखा यांच्या अल्टमॅट फायबरची किंमत 330 ते 650 रुपये प्रति किलो आहे व हे फायबर नक्कीच रेशीम आणि लोकरपेक्षा देखील अधिक स्वस्त व परवडणारे आहे. हे फायबर तयार करण्यासाठी औषधी पिकांच्या टाकाऊ पदार्थ तसेच फळे व तेल बिया इत्यादींच्या टाकाऊ पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेष म्हणजे हे फायबर तयार करण्यासाठी शिखा यांची कंपनी इतर देशांमधून देखील शेती कचरा आयात करते. त्यांच्या या कंपनीमुळे शेतकऱ्यांचे कचरा विल्हेवाटीची समस्या तर सुटतेच परंतु प्रदूषणाला देखील आळा बसत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office