संपूर्ण जगामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. बहुतेक देशांनी लॉकडाऊन लागू केला आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र सध्या सोशल डिस्टन्सिंगसाठी 6 फुटांचं अंतर निश्चित करण्यात आलं आहे ते पुरेसं नाही.कारण जवळपास १८ फुटांपर्यंत कोरोना पसरू शकतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार हलकी हवा वाहत असेल, तर सौम्य खोकल्यानंही व्हायरस असलेले ड्रॉपलेट्स 18 फुटांपर्यंत हवेत राहू शकतात.
साइप्रसच्या निकोसिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, कोरोनाव्हायरसतचा हवेतील प्रसाराला समजून घेण्याची गरज आहे. फिजिक्स ऑफ फ्ल्युड जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे.
हेल्थलाइननुसार, संशोधकांनी एक कॉम्प्युटर सिम्युलेशन मॉडेल तयार केलं असून खोकल्याद्वारे निघणाऱ्या लाळेच्या कणांच्या हवेतील गतिविधींचा अभ्यास केला जात आहे.
अभ्यासानुसार, पाच किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या हलक्या हवेत माणसाच्या लाळेचे कण पाच सेकंदात अठरा फुटांपर्यंत जाऊ शकतात असा निष्कर्ष निघाला आहे.
डिमिट्रिस ड्रिकाकिस यांनी सांगितल, हे ड्रॉपलेट्स जर कमी उंचीच्या व्यक्तीच्या संपर्कात आले तर त्यांना याचा जास्त धोका होऊ शकतो.