स्पेशल

घर घेताना ते बांधकाम सुरू असलेले घर घ्यावे की बांधून रेडी असलेले? कोणते घर खरेदी करणे ठरते फायद्याचे? जाणून घ्या माहिती

Published by
Ajay Patil

Home Buying Tips:- स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे हे पाहिजे तेवढी सोपी गोष्ट नाही. कारण ग्रामीण भाग असो की शहरी भाग प्रत्येक ठिकाणी घरांच्या किंवा जागांच्या किंमतींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे घर घेणे प्रत्येकालाच परवडते असे नाही.

परंतु तरीदेखील बरेच व्यक्ती होमलोन व इतर पर्यायातून पैसे उभे करतात व घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु घर घेताना त्यामध्ये पैसे गुंतवावे लागतात व पैसे गुंतवताना बऱ्याचदा गोंधळ उडतो की नेमके अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजेच बांधकाम सुरू असलेले घर घ्यावे की बांधकाम होऊन विक्रीसाठी तयार असलेले घर घ्यावे?

परंतु जर आपण रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्या मते बांधकामाधिन मालमत्ता खरेदी करणे जास्त फायद्याचे ठरू शकते. नेमके अशा प्रकारच्या घरात किंवा प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचे काय फायदे मिळू शकतात? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.

 अंडर कन्स्ट्रक्शन मालमत्तेत गुंतवणूक केल्याने मिळू शकतात हे फायदे

1- गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता बऱ्याचदा बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता असते व जोपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होईल तोपर्यंत तुमच्या घराच्या किमतीत देखील वाढ होऊ शकते.

परंतु यामध्ये गुंतवणूकदारांनी संयम राखणे खूप गरजेचे असते. त्या परिस्थितीमध्ये कमीत कमी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त नफा कमवण्याची संधी मिळत असते.

2- पेमेंट करण्यासाठी मिळतो मोठा कालावधी अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजेच बांधकाम सुरू असलेला प्रकल्प असेल तर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी दीर्घ कालावधी मिळू शकतो. अनेक प्रकल्पांमध्ये बिल्डर हे गुंतवणूकदाराकडून पेमेंट टप्प्याटप्प्याने किंवा हप्त्यांमध्ये घेतात.

त्यामुळे गुंतवणूकदारांना अपार्टमेंटची जी काही किंमत असेल त्यानुसार पेमेंट करण्याला वेळ मिळतो व खरेदीदारावर अचानकपणे आर्थिक बोजा येत नाही किंवा कर्जाचा डोंगर देखील चढत नाही.

3- किमतीमध्ये मिळू शकते चांगली सूट बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये जर घर खरेदी केले तर त्याचा एक मोठा फायदा असा मिळतो घराचे बांधकाम तुमच्यासमोर सुरू असते.

त्यामुळे बांधकामाचा दर्जा कसा आहे हे तुम्हाला कळते. तसेच बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये बऱ्याचदा मोठ्या प्रकारची सूट देखील दिली जाते. बरेच बिल्डर आणि डेव्हलपर नवीन प्रकल्पांवर विविध प्रकारच्या सवलती देत असतात.

 रेरा कायद्यामुळे फसवणुकीचा धोकाही संभवत नाही

अगोदर बऱ्याचदा पैसे देऊन देखील घराचा ताबा मिळत नसे किंवा बिल्डरांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असे या व अशा अनेक प्रकारच्या समस्या प्रॉपर्टी खरेदीदारांना यायच्या.

परंतु आता रियल इस्टेट क्षेत्रामध्ये रियल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी अर्थात रेरा कायदा आल्यापासून या क्षेत्रातील अनेक गैरप्रकार आता बंद झालेले आहेत. गुंतवणूकदारांना आता रिअल इस्टेट क्षेत्रातील त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून या कायद्याच्या माध्यमातून खात्री मिळते.

रेरा कायद्याने आता बिल्डरांना अनेक प्रकारची बंधने घालून दिली असल्याने रेरा कायद्याचे जे काही नियम आणि सूचना आहे त्यानुसार प्रकल्पाची नोंदणी करणे आवश्यक असते. यामुळे सर्वसामान्य लोकांना खूप मोठा दिलासा मिळण्यास रेरा मुळे मदत झालेली आहे.

Ajay Patil