आयुष्यामध्ये जर एखादा निर्णय आपण घेतला व निर्णय घेताना जर त्यामध्ये थोडीफार चूक झाली तर बऱ्याचदा आपल्याला महत्त्वाच्या निर्णयाचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. याप्रमाणे तरुणपणी कुठलाही प्रकारचा निर्णय घेताना तो खूप सावधानतेने घेणे खूप गरजेचे असते.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण आजकालच्या तरुणाईचा विचार केला तर कधी कधी काही निर्णय खूप झटपट आणि कुठलाही प्रकारचा विचार न करता घेतले जातात व त्याचे परिणाम आयुष्यभर भोगायची वेळ तरुणांवर येते. याच पद्धतीने जर उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळाली तर लगेच तरुणाई कडून घर खरेदीसाठी प्रयत्न सुरू होतात व होमलोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण केले जाते.
जर आपण गेल्या काही वर्षातील देशात होणाऱ्या घर खरेदीची स्थिती पाहिली तर अनेक मध्यम वर्गीय कुटुंबाच्या माध्यमातून दोन बीएचके फ्लॅट खरेदी करण्याला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य मिळताना दिसून येत आहे.
उदाहरणादाखल जर आपण घेतले तर एखादा फ्लॅट पन्नास लाख रुपयांमध्ये जर तुम्हाला मिळत असेल तर त्याकरिता तुम्हाला सात ते आठ लाख रुपये डाऊन पेमेंट करावे लागते व त्यापुढे लागणारा इतर खर्च करावा लागल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार येऊ शकतो.
नवीन घर खरेदीमध्ये येऊ शकतो प्रचंड खर्च
समजा तुम्हाला दोन बीएचकेचा फ्लॅट खरेदी करायचा असेल तर व तुम्हाला एखादा फ्लॅट पन्नास लाख रुपयांमध्ये जर मिळत असेल तर तुम्हाला त्यासाठी सात ते आठ लाख रुपये डाऊनपेमेंट करणे गरजेचे असते. 50 लाख रुपयाच्या फ्लॅट करिता तुम्हाला पंधरा टक्के रक्कम डाऊन पेमेंट साठी द्यावी लागते. एवढेच नाही तर मुद्रांक शुल्क तसेच नोंदणी चार्ज आणि ब्रोकरेज इत्यादीसाठी खर्च करावा लागतो.
दुसरे म्हणजे नवीन घर घेतले म्हणजे त्यामध्ये सजावट आणि इतर दुरुस्ती आलीच त्यासाठी देखील तुम्हाला दोन ते तीन लाख रुपये आरामात खर्च येतो. याचाच अर्थ तुम्ही गृहप्रवेश कराल त्या अगोदरच बारा ते पंधरा लाख रुपये तुमचा खर्च झालेला असतो.
50 लाख रुपयांचे घर खरेदीसाठी सात लाखाचे डाऊनपेमेंट आवश्यक असतं व क्रेडिट स्कोर तुमचा उत्तम असेल तर नऊ टक्क्यांचे व्याज सरासरी आकारले जाते व नऊ टक्के हिशोबाने बघितले तर वीस वर्षाकरिता 43 लाखांच्या हिशोबाने साधारणपणे 38 हजार 688 रुपये एमआय भरणे तुम्हाला गरजेचे असते. हा सगळा प्रकारचा आर्थिक भार हा नवीन घर खरेदीमुळे तुमच्यावर येत असतो.
घर खरेदी करण्याऐवजी जर भाड्याने घेतले तर…
घर खरेदी करण्याचा विचार तुम्ही सोडला व भाड्यावर घर घेऊन राहायचा विचार केला तर भाड्याने घेतलेल्या घरासाठी तुम्हाला पंधरा ते सतरा हजारांचे भाडे भरावे लागू शकते. या दृष्टिकोनातून बघितले तर होमलोन साठी भरावा लागणारा ईएमआय आणि भाडेपोटी द्यावे लागणारे भाडे यांची तुलना केली तर तुमचे तब्बल 21 हजार रुपये प्रत्येक महिन्याला वाचतात.
हीच वाचलेली रक्कम जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर कोट्यावधी रुपयांचा फंड तुम्ही जमा करू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे होम लोन घेऊन जो तुम्ही ईएमआय भराल ती रक्कम तुम्ही भाड्याच्या घरात राहत असेल तर वाचवू शकतात
व ही वाचवलेली रक्कम तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून कोट्यावधी रुपये कमावू शकतात. वीस वर्षात तुमच्याकडे साधारणपणे तीन ते पाच कोटी रुपये रक्कम जमा होऊ शकते. नंतर तुम्ही एक काय दोन घरं देखील आरामात खरेदी करू शकतात.
अशा प्रकार जर आपण बघितले तर घर खरेदी करणे ऐवजी जर तुम्ही काही वर्ष भाड्याच्या घरात काढले तर नक्कीच हा फायद्याचा सौदा तुमच्यासाठी ठरु शकतो.