Silver Price: आपण गेल्या वर्षभरापासून जर सोने आणि चांदीचे दर पाहिले तर यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसून आली. सोने आणि चांदीचे दर प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सोने चांदीची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्याचे सध्या आपल्याला दिसून येत आहे.
नुसते चांदीच्या बाबतीत बघायचे झाले तर जागतिक बाजारामध्ये देखील चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. जगभरातील जे काही उद्योग आहेत त्यामध्ये चांदीची मागणी झपाट्याने वाढत असून येणाऱ्या कालावधीत चांदीच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीज कमोडिटीचे प्रमुख अनुज गुप्ता यांनी म्हटले की, चांदीचा जो काही जागतिक पुरवठा आहे त्यावर दबाव असून चांदीच्या सर्वेक्षणानुसार मागणीच्या तुलनेत चांदीच्या पुरवठा कमी असण्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे.
याविषयीची आकडेवारी बघितली तर 2023 मध्ये चांदीच्या मागणीच्या तुलनेमध्ये 4,025.63 टन चांदीची कमतरता दिसून आलेली होती व 2024 मध्ये चांदीच्या औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या मागणीत 7513 टन घट होण्याची शक्यता आहे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये यावर्षी चांदीची किंमत 90 हजार रुपये किलो पर्यंत पोहोचण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या घटकांमुळे भविष्यात वाढेल चांदीची किंमत
1- सौर पॅनलमध्ये वाढेल चांदीचा वापर– सौर पॅनलमध्ये 2025 पर्यंत चांदीचा वापर दुप्पट होण्याची शक्यता आहे. 2025 पर्यंत जागतिक सौर ऊर्जा आस्थापने दुप्पट होतील असा अंदाज असून त्यामुळे सौर पॅनलमध्ये जो काही चांदीचा वापर आहे तो वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे व यामुळे चांदीच्या किमती वाढतील.
2- जागतिक पातळीवर असलेल्या मोठ्या देशातील तणाव– जागतिक पातळीवर आपण बघितले तर रशिया आणि युक्रेन, इजराइल आणि हमास या देशातील तणावामुळे देखील अनिश्चितता वाढली असून जगातील ज्या काही मध्यवर्ती बँक आणि श्रीमंत लोक आहेत ते सोने आणि चांदीचा साठा वाढवत आहेत. त्यामुळे चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
3- इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढेल चांदीचा वापर– सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आपल्याला वाढताना दिसून येत असून या ईव्हीमध्ये चांदीचा वापर झपाट्याने वाढत आहे व पायाभूत गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे वाहन क्षेत्रामध्ये असणारी चांदीची मागणी 2025 पर्यंत 5250 टनापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे व यामुळे देखील चांदीची किंमत वाढू शकते.
4- फेडरल रिझर्वची व्याजदर कपात– अमेरिकन व्याजदरात 2008 नंतर कपात निश्चित मानली जात आहे व यामुळे उद्योगांना स्वस्त कर्ज मिळेल. औद्योगिक वाढ वाढेल आणि त्यामुळे चांदीचा खप आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे कारण देखील चांदीच्या किमती वाढवण्यासाठी कारणीभूत ठरेल.
एका वर्षात जाऊ शकते सव्वा लाख रुपये किलो पर्यंत चांदीची किंमत?
कमोडिटी कन्सल्टन्सी फर्म केडीया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते जर बघितले तर जगातील जे काही उद्योगधंदे आहेत त्यामध्ये चांदीचा वापर वाढत आहे.5G, सेमी कंडक्टर तसेच इलेक्ट्रिक वाहनांपासून ते वैद्यकीय उपकरणापर्यंत सर्व ठिकाणी आता चांदीचा वापर केला जात असून मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे चांदीची किंमत वाढण्याची शक्यता आहे.
औद्योगिक वापरात चांदीचा वापर वाढल्यामुळे आणि व्याजदर झालेली कपात, चांदी मधील वाढती गुंतवणूक इत्यादीमुळे चांदीची मागणी दुपटीने वाढली असून पुढील एक वर्षात चांदीची किंमत एक लाख 25 हजार ते एक लाख 50 हजार रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचू शकते. सध्या मागणीच्या तुलनेत 7500 टनांचा चांदीचा तुटवडा भासत आहे.