Small Business Idea : तुम्हालाही जर आगामी काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा लेख तुमच्या कामाचा ठरेल. खरेतर, अनेकांचे स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न असते. कारण की, आता नोकरीमध्ये फारच अस्थिरता पाहायला मिळत आहे. कोरोना काळापासून नोकरीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता तयार झाली असून यामुळे अनेकजण नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य देत असल्याची वास्तविकता आहे.
म्हणून जर तुम्हाला तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आम्ही तुम्हाला अवघ्या 50 हजाराच्या गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या एका व्यवसायाची माहिती सांगणार आहोत. अनेकांना असे वाटते की व्यवसाय सुरु करण्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते.
मात्र असेही काही व्यवसाय आहेत जे की खूपच कमी गुंतवणुकीत, अवघ्याच 50 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत देखील सुरू होऊ शकतात. काही व्यवसाय असेही आहेत जे की एकही रुपया इन्वेस्ट न करता सुरू करता येतात. मात्र आज आपण पन्नास हजार रुपये इन्वेस्ट करून सुरू करता येणाऱ्या एका व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण कॉटन बड्स बनवण्याच्या व्यवसायाबद्दल माहिती पाहणार आहोत.
कसा सुरु करणार कॉटन बड्स बनवण्याचा व्यवसाय
हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला छोट्या यंत्रांचा वापर करू शकता. या व्यवसायासाठी सुरुवातीला 50 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागतो. जर तुमच्याकडे एवढेही पैसे नसतील तर तुम्हाला या व्यवसायासाठी कर्ज सुद्धा मिळू शकते. कॉटन बड्स बनवण्यासाठी, प्लास्टिक किंवा लाकडाची स्टिक वापरली जाते जी की बाजारात सहज उपलब्ध होते.
कॉटन बड्स तयार स्टिकच्या दोन्ही टोकांना कापूस लावला जातो. कॉटन बड्सचा वापर हा मेडिकल सेक्टर मध्ये होतो शिवाय कान साफ करण्यासाठी याचा वापर होतो. याशिवाय इतरही अनेक सेक्टरमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तुम्ही कधी मेडिकल लॅबला गेला असाल तेव्हा तुम्ही तिथे कॉटन बड्स नक्कीच पाहिले असेल.
विविध टेस्ट करण्यासाठी जेव्हा नाकातून नमुने घ्यावे लागतात तेव्हा हे बड्स वापरले जाते. याला मेडिकल लँग्वेज मध्ये कॉटन स्वॅब असे सुद्धा म्हणतात. म्हणजेच या कॉटन बड्सची मागणी सर्वत्र आहे. त्यामुळे तुम्हाला या व्यवसायातून नक्कीच चांगली कमाई होणार आहे.
कॉटन बड्स तयार करण्यासाठी काय साहित्य लागत
कॉटन बड्स बनवण्यासाठी वापरली जाणारी स्टिक सहसा लाकडाची असते. यामुळे ही स्टिक इको फ्रेंडली बनते. या काडीची लांबी 5 सेमी ते 7 सेमी असावी. अगदी नाममात्र किमतीत तुम्हाला ते बाजारात सहज मिळेल. यानंतर कापूस लागेल. जे तुम्ही स्पिंडलच्या दोन्ही टोकांना लावाल.
कमी किमतीतही तुम्हाला कापूस बाजारात सहज मिळेल. काडीच्या दोन्ही बाजूंना कापूस चिकटवण्यासाठी, तुम्हाला त्याच्या दोन्ही टोकांना चिकट पदार्थ वापरावा लागेल. जेणेकरून कापूस त्यावर घट्ट चिकटू शकेल. कॉटन बड्स रेडी झालेत की त्यावर सेल्युलोज पॉलिमर केमिकल युज करावे लागते. असे केल्याने कॉटन बड्सला स्पॉटिंग आणि बुरशी लागत नाही.
किती कमाई होणार?
कॉटन बड्स बनवल्यानंतर तुम्ही मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल्स, टेस्टिंग लॅब, कॉस्मेटिक प्रोडक्ट्सची दुकाने, ब्युटी पार्लर सेंटर्स, इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग मार्केट्स, पेंटिंग प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकू शकता. आजकाल मिनी स्टोअर्स, जनरल स्टोअर्स मध्येही याची विक्री केली जाऊ शकते. या व्यवसायातून तुम्हाला सहजतेने महिन्याकाठी 20-30 हजाराची कमाई होऊ शकते.