स्पेशल

तुमच्या घरात 50 हजार पडलेले असतील तर ‘हा’ बिजनेस सुरु करा ! पहिल्या दिवसापासूनच होणार रेकॉर्ड ब्रेक कमाई

Published by
Tejas B Shelar

Small Business Idea : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न असेल. जर तुमचेही असेच स्वप्न असेल आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण अवघ्या पन्नास हजाराच्या गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या एका भन्नाट व्यवसायाची माहिती पाहणार आहोत.

व्यवसाय म्हटलं की लाखो रुपयांचे भांडवल लागते असा सर्वांचाच समज असतो. मात्र असेही काही व्यवसाय आहेत जे की खूपच कमी गुंतवणुकीत सुरू होऊ शकतात. असाच एक व्यवसाय आहे कॉटन बड्स बनवण्याचा. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला फारच कमी खर्च करावा लागतो.

कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू होणाऱ्या या व्यवसायातून नफा देखील भरपूर मिळतो. भारत सरकार देखील मेड इन इंडियाचा प्रचार करत आहे. नवीन स्टार्टअप आणि व्यवसायांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे.

कसा सुरु करणार व्यवसाय

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला छोट्या यंत्रांचा वापर करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला जवळपास 50 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो. जर तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर तुम्ही यासाठी कर्जही काढू शकता.

कॉटन बड्स बनवण्यासाठी, प्लास्टिक किंवा लाकडाची स्टिक वापरली जाते जी की बाजारात सहज उपलब्ध होते. कॉटन बड्स तयार स्टिकच्या दोन्ही टोकांना कापूस लावला जातो. कॉटन बड्सचा वापर हा मेडिकल सेक्टर मध्ये होतो शिवाय कान साफ करण्यासाठी याचा वापर होतो.

याशिवाय इतरही अनेक सेक्टरमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तुम्ही कधी मेडिकल लॅबला गेला असाल तेव्हा तुम्ही तिथे कॉटन बड्स नक्कीच पाहिले असेल. विविध टेस्ट करण्यासाठी जेव्हा नाकातून नमुने घ्यावे लागतात तेव्हा हे बड्स वापरले जाते.

याला मेडिकल लँग्वेज मध्ये कॉटन स्वॅब असे सुद्धा म्हणतात. म्हणजेच या कॉटन बड्सची मागणी सर्वत्र आहे. त्यामुळे तुम्हाला या व्यवसायातून नक्कीच चांगली कमाई होणार आहे.

कॉटन बड्स तयार करण्यासाठी काय साहित्य लागत

कॉटन बड्स बनवण्यासाठी वापरली जाणारी स्टिक सहसा लाकडाची असते. यामुळे ही स्टिक इको फ्रेंडली बनते. या काडीची लांबी 5 सेमी ते 7 सेमी असावी. अगदी नाममात्र किमतीत तुम्हाला ते बाजारात सहज मिळेल. यानंतर कापूस लागेल. जे तुम्ही स्पिंडलच्या दोन्ही टोकांना लावाल. कमी किमतीतही तुम्हाला कापूस बाजारात सहज मिळेल.

काडीच्या दोन्ही बाजूंना कापूस चिकटवण्यासाठी, तुम्हाला त्याच्या दोन्ही टोकांना चिकट पदार्थ वापरावा लागेल. जेणेकरून कापूस त्यावर घट्ट चिकटू शकेल. कॉटन बड्स रेडी झालेत की त्यावर सेल्युलोज पॉलिमर केमिकल युज करावे लागते. असे केल्याने कॉटन बड्सला स्पॉटिंग आणि बुरशी लागत नाही.

किती कमाई होणार?

कॉटन बड्स बनवल्यानंतर तुम्ही मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल्स, टेस्टिंग लॅब, कॉस्मेटिक प्रोडक्ट्सची दुकाने, ब्युटी पार्लर सेंटर्स, इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग मार्केट्स, पेंटिंग प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकू शकता. आजकाल मिनी स्टोअर्स, जनरल स्टोअर्स मध्येही याची विक्री केली जाऊ शकते. या व्यवसायातून तुम्हाला सहजतेने महिन्याकाठी 20-30 हजाराची कमाई होऊ शकते.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com