Small Business Idea : व्यवसाय करायचा म्हटलं तर भांडवल असणे आवश्यक असते. भांडवलाशिवाय कोणताच व्यवसाय सुरू होऊ शकत नाही. मात्र काही असे व्यवसाय आहेत जे की कमी भांडवल असले तरी देखील सुरू केले जाऊ शकतात. म्हणजेच व्यवसायासाठी अगदीच लाखो रुपये लागतात असे नाही. तर काही व्यवसाय हे कमी गुंतवणुकीत देखील सुरू होऊ शकतात. मात्र अनेकांना कमी गुंतवणुकीत कोणता व्यवसाय सुरू होऊ शकतो ? याची कल्पना नसते. यामुळे, आज आपण एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या काही प्रमुख व्यवसायांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू होणारे व्यवसाय कोणते ?
कुरिअर सर्व्हिसेस : तुमच्या खिशात एक लाख रुपये असतील आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर कुरियरचा व्यवसाय तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. हा व्यवसाय तुम्ही दोन पद्धतीने सुरू करू शकता. जर तुम्हाला कुरियर सर्विसेस बाबत फारशी माहिती नसेल आणि तुम्हाला व्यवसाय सुरू केल्याबरोबरच यातून चांगली कमाई हवी असेल तर तुम्ही सध्या ज्या कंपनीज कुरिअर सेवा देत आहेत त्या कंपनीसोबत जॉईन्ट होऊ शकता. कुरियर सेवा देणाऱ्या कंपनीसोबत टायअप करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही जर हा व्यवसाय चालवला तर तुम्हाला सदर कंपनीकडून एक फिक्स कमिशन मिळणार आहे. किंवा मग तुम्ही स्वतःची कुरियर सर्विसेस देणारी कंपनी सुरू करू शकता. जर तुम्ही कुरिअर सर्व्हिसेस कंपनी सुरू केली तर तुम्हाला तुमच्या ग्राहकांच्या वस्तू किंवा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तुमच्याकडे वाहन असणे आवश्यक राहणार आहे. जर तुमच्याकडे स्वतःचे वाहन असेल तर तुम्ही हा व्यवसाय फक्त एक लाख रुपयात सुरू करू शकता. जर तुमच्याकडे स्वतःचे वाहन नसेल तर तुम्ही भाड्याने वाहन घेऊ शकता आणि हा व्यवसाय चालवू शकता.
मोबाईल रिपेरिंगचा बिजनेस : सध्याच्या युगाला मोबाईल युग म्हटले जात आहे. ‘मोबाईलचे युग’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे सध्या प्रत्येकाकडेच हँडसेट आहेत. प्रत्येक जण मोबाईलचा वापर करतोय. मोबाईल ही एक प्रमुख इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. त्यामुळे मोबाईल बिघडणे स्वाभाविक आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू काही काळाने बिघडते.
मात्र इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडल्यानंतर लगेचच तिला कचराकुंडीत फेकले जाऊ शकत नाही. मोबाईल तर कदापी फेकला जाऊ शकत नाही. कारण कि, मोबाईलची किंमत ही काही कमी नसते. अशावेळी मोबाईल बिघडला तर त्याची रिपेरिंग केली जाते. त्यामुळे जर तुम्हीही एखादा व्यवसाय चालवण्याच्या तयारीत असाल तर मोबाईल रिपेरिंगचा बिजनेस तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकणार आहे.
या व्यवसायासाठी तुम्हाला सुरुवातीला एक लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. मोबाईलसोबतच तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटर रिपेरिंग देखील करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही नवीन मोबाईल विक्री देखील करू शकता. याशिवाय मोबाईल ॲक्सेसरीज देखील विक्रीसाठी ठेवू शकता. असे केल्याने तुमच्या व्यवसायाचे स्वरूप वाढणार आहे आणि साहजिकच यातून तुम्हाला चांगली कमाई देखील होणार आहे.
फुलांचा व्यवसाय : हा असा व्यवसाय आहे ज्याला बारामहिने मागणी असते. भारतात प्रत्येक महिन्यात कोणते ना कोणते सण साजरे केले जातात. दरम्यान या सणासुदीच्या काळामध्ये फुलांना मोठी मागणी असते. शिवाय सध्या सुरू असलेल्या लग्नसराईत देखील फुलांना मोठी मागणी असते. तसेच छोटा-मोठा फंक्शन असला तरी देखील सजावटीसाठी फुल लागतातच. त्यामुळे फुलांचा व्यवसाय हा कधीच मंदीत येऊ शकत नाही.
यासाठी तुम्हाला फुल भंडार शॉप ओपन करावे लागणार आहे. हे शॉप ओपन करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. तसेच तुम्हाला शेतकऱ्यांकडून किंवा बाजारांमधून फुले खरेदी करून आणावे लागतील. बाजारातून फुले खरेदी करून आणल्यानंतर तुम्ही त्यापासून फुलहार, गजरा, बुके असे प्रॉडक्ट बनवू शकता आणि याची विक्री तुमच्या फुल भंडारातून करू शकता.
कार वॉशिंग बिझनेस : अलीकडे शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो सर्वत्र वाहनांचा वापर वाढला आहे. तुमच्याकडेही टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर असेलच. खरेतर वाहनाची सर्विसिंग करणे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच ते वाहन स्वच्छ ठेवणे देखील आवश्यक असते. यामुळे महिन्यातून किमान एकदा तरी वाहन धुतले जाते.
आता अनेकांकडे वेळ नसल्याने ते कार वॉशिंग सेंटरवर जाऊन आपले वाहन धुतात. यामुळे जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर यातून तुम्हाला चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. मात्र हा व्यवसाय जिथे कार किंवा मोटरसायकलचे शोरूम असेल, गॅरेज असेल अशा ठिकाणीच सुरू केला पाहिजे जेणेकरून तुमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल.