बिजनेस असावा तर असा ! दिवसाला फक्त 4-5 घंटे काम अन कमाई लाखोंच्या घरात, किती गुंतवणूक करावी लागते? पहा…

व्यवसाय म्हटलं की लाखो रुपयांची गुंतवणूक असा मराठी माणसाचा समज आहे. यामुळेच की काय मराठी माणूस व्यवसायात फारसा अग्रेसर दिसत नाही. परंतु व्यवसायासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागतेच असे काही नाही. असेही काही व्यवसाय आहेत जे अवघ्या काही आजाराच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतात.

Published on -

Small Business Idea : जर तुम्हालाही आगामी काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाचे ठरणार आहे. आज आपण अवघ्या काही हजाराच्या गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या एका भन्नाट व्यवसायाची माहिती पाहणार आहोत. व्यवसाय म्हटलं की लाखो रुपयांची गुंतवणूक असा मराठी माणसाचा समज आहे.

यामुळेच की काय मराठी माणूस व्यवसायात फारसा अग्रेसर दिसत नाही. परंतु व्यवसायासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागतेच असे काही नाही. असेही काही व्यवसाय आहेत जे अवघ्या काही आजाराच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतात.

महत्त्वाचे म्हणजे अशा कमी गुंतवणुकी सुरू होणाऱ्या व्यवसायातून सुद्धा लाखो रुपयांची कमाई करता येऊ शकते. कोरोना काळापासून महाराष्ट्रातील अनेक नवयुवक तरुणांनी असे छोटे मोठे व्यवसाय सुरू केले आहेत.

काही तरुणांनी चहाचा व्यवसाय सुरू केला आहे तर काही तरुणांनी स्वतःचा कपड्याचा व्यवसाय सुरू केला आहे. दरम्यान आज आपण चहा, कपडा, फुटवेअरऐवजी अशा एका व्यवसायाची चर्चा करणार आहोत ज्याबद्दल कदाचित तुम्हाला कोणीच सांगितलेले नसेल. आज आपण सूप बनवण्याच्या व्यवसायाची माहिती पाहणार आहोत.

मंडळी कोरोना काळापासून लोक आपल्या आरोग्याच्या बाबत अधिक सजग झालेले आहेत. यामुळे सूप ची मागणी वाढली आहे. म्हणून जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि भांडवल कमी असेल तर तुम्ही सूप बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

यासाठी तुम्हाला एक शॉप उघडावे लागणार आहे. तुम्ही तुमच्या शहरातील मार्केट प्लेस मध्ये एखादे शॉप भाड्याने घेऊ शकता आणि त्या ठिकाणी सूप बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

5 घंटे काम आणि लाखो रुपयांची कमाई!

तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर जिथे जास्त गर्दी असेल तिथे दुकान उघडणे तुमच्यासाठी चांगले राहणार आहे. अशा स्थितीत तेथील दुकानाचे भाडे तर जास्त असेलच पण उत्पन्नही जास्त असेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे व्यवसाय पुढे नेण्यास मदत होईल. सूपचा व्यवसाय सुरू करताना लोकांची चव लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

लोकांना कोणत्या प्रकारचे सूप आवडेल ते आधी तपासा. लोकांकडे चाचणीचे बरेच पर्याय असले पाहिजेत. यासोबतच खर्च आणि मार्जिनवर सुद्धा विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कमी पैसे गुंतवून तुम्ही ते सुरू करू शकता. नंतर, तुम्ही जसजसे अधिक पैसे कमवाल तसतसा हा व्यवसाय आणखी वाढवू शकता.

किती गुंतवणूक करावी लागणार आणि कमाई किती होणार?

सूप बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 50 हजाराची गुंतवणूक करावी लागू शकते. सुपाचे एक बाउल बनवण्यासाठी दहा ते पंधरा रुपयांचा खर्च येतो आणि हे बाउल चाळीस ते पन्नास रुपयांना विकले जाते. अशा तऱ्हेने तुम्ही या व्यवसायातून दुपटीने नफा कमवू शकता. तुम्ही प्रत्येक महिन्याला दोन ते अडीच हजार सूप बाउल विकले तरी तुम्हाला यातून लाखो रुपयांची कमाई होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe