स्पेशल

Snake Information: सापांना ऐकू येते का? सापांना कान असतात का? वाचा सापाबद्दलची ‘ही’ रंजक माहिती

Published by
Ajay Patil

Snake Information:- साप म्हटले म्हणजे प्रत्येकाला भीती वाटते. अगदी तुमच्या समोरून साप गेला किंवा काही अंतरावरून देखील साप गेला तरी आपल्या काळजात धस्स होते आणि आपण पळायला लागतो. सापाबद्दल मानवाच्या मनामध्ये भीती इतकी ठासून भरलेली आहे की  अगदी कुठे जरा फिरत असताना गवतामध्ये किंवा झुडपामध्ये जरा हालचाल झाली तरी आपल्याला वाटतं की त्या ठिकाणी सापच असावा व आपण त्या ठिकाणाहून काढता पाय घेतो.

इतके आपण सापाला घाबरत असतो. परंतु सापाबद्दल एक महत्त्वाचा विचार केला तर सगळे साप हे विषारी नसतात. सापांच्या जितके प्रजाती आहेत त्यापैकी काही बोटावर मोजण्या इतक्या प्रजाती या विषारी असतात. परंतु साप म्हटले म्हणजे विष व त्यामुळे होणारे मृत्यू आपल्या डोळ्यासमोर येतो.

याच सापांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्यांच्या बाबतीत बऱ्याच बाबी किंवा गोष्टी इतक्या गुढ आणि रहस्यमयी आहेत की आपल्याला त्या जाणून खूप आश्चर्यचकित होते. त्यातील जर आपण एक महत्त्वाची बाबीचा विचार केला तर आपल्याला कधीतरी प्रश्न पडला असेल की सापाला ऐकू येते का किंवा त्याला कान असतात का?

आपण सगळ्यांनी साप पाहिलेला आहे व आपण त्याला कधी कान असलेले पाहिले नसेल व त्यामुळे आपल्या मनात येते की साप ऐकू शकतो का किंवा ऐकत असेल तर कसा? हा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. याच बद्दलची महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 सापांना कान असतात का?

आपल्यापैकी ज्या व्यक्तींनी साप पाहिला असेल त्यांना माहिती आहे की सापाला कान नसतात. कारण त्याच्या शरीरावर कुठेच आपल्याला कान दिसून येत नाही. पण सापांबद्दल जर तुम्ही विचार केला तर त्यांना चांगले ऐकू येते किंवा तो चांगल्या पद्धतीने ऐकू शकतो. मग आता आपल्याला प्रश्न पडेल की नेमकं याला कान नसतात तर मग साप ऐकू तरी कसा शकतो?

तर याचे उत्तर म्हणजे सापांना ऐकण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा असते. जरी इतर सामान्य प्राण्यांसारखे सापाला कान दिसत नसले तरी बाहेरून स्पष्ट न दिसणारे परंतु शरीरांतर्गत त्यांना कान असतात. यामध्ये जर आपण काही माहितीचा आधार घेतला तर यानुसार सापांच्या शरीरामध्ये एक छोटेसे हाड असते व हे हाड जबड्याच्या हाडाला कानाच्या अंतर्गत भागासोबत जोडते.

त्यामुळे कोणत्याही प्रकारचे हालचाल किंवा आवाजाची माहिती किंवा आकलन सापांना त्यांच्या कातडीच्या किंवा त्वचेच्या माध्यमातून होत असते. त्वचेच्या माध्यमातूनच कानांच्या मदतीने सापांच्या मेंदूकडे हा आवाज जातो आणि सापांना आवाजाचे आकलन होते किंवा माहिती मिळते.

मानवाच्या तुलनेत जर विचार केला तर मानवाला जर कुठलाही आवाज माणसाच्या कानावर आला तर तो आधी एयर ड्रमवर आदळतो. त्यानंतर कंपन निर्माण होते व हे कंपन मेंदूपर्यंत जाते व आपल्याला ऐकायला येते. परंतु सापांमध्ये अशा प्रकारचा एअर ड्रम नसतो. साप त्याच्या अंतर्गत कानाच्या माध्यमातून आवाज ऐकू शकतात.

 सापांची ऐकण्याची क्षमता किती असते?

मिळालेल्या माहितीनुसार सापांची जी काही ऐकण्याची क्षमता असते ती मर्यादित असते. म्हणजेच साप फक्त दोनशे ते तीनशे हर्ट्स फ्रिक्वेन्सी असणारा आवाजच ऐकू शकतात.

Ajay Patil