Snake Interesting Fact:- जगाच्या पाठीवर सापाच्या 2500 ते 3000 पर्यंत प्रजाती आहेत. यातील बहुसंख्या प्रजाती या बिनविषारी असून अगदी मोजक्याच जाती या विषारी आहेत हे आपल्याला माहिती आहे. भारताचा विचार केला तर भारतामध्ये अवघ्या चार ते पाच सापाच्या जाती या अतिविषारी प्रकारामध्ये मोडले जातात.
साप विषारी असतात आणि सापाने चावा घेतला तर व्यक्तीचा मृत्यू होतो इतकीच माहिती जास्त करून आपल्याला सापाबद्दल आहे. परंतु अशी अनेक मनोरंजक अशी तथ्य सापांच्या बाबतीत आहेत की ज्या तुम्ही कधीही ऐकले किंवा वाचले नसतील. नेमकी ही तथ्य कोणती आहेत? याबद्दलचीच माहिती या लेखात घेऊ.
सापाबद्दल असणाऱ्या या मनोरंजक गोष्टी
1- तुम्हाला माहित आहे का की सापांना पापण्या नसतात.
2- एकूण 24 तासांपैकी सुमारे 16 तासांपर्यंत साप झोप काढतात.
3- सापांचे जबडे लवचिक असल्यामुळे ते त्यांच्या डोक्यापेक्षा मोठी शिकार देखील सहजपणे गिळंकृत करू शकतात.
4- सापांना अंतर्गत कान असतात. आपल्याला माहित आहे की त्यांना बाह्य कान नसतात. त्यांच्याकडे अंतर्गत ध्वनी प्रणाली असते व त्याद्वारे ते ऐकू शकतात.
5- असे म्हटले जाते की सापांना उष्णता आवडते कारण ते थंड रक्ताचे सरपटणारे प्राणी आहेत.
6- जगातील सर्वात लांब साप पायथन रॅटिक्युलेट्स याला मानले जाते व त्याची लांबी तीस फूट पर्यंत असू शकते.
7- भारतामध्ये 300 प्रजाती सापांच्या आढळतात व त्यापैकी 50 प्रजाती विषारी आहेत.
8- सापाच्या ज्या प्रजाती पाण्यामध्ये राहतात ते श्वास घेण्याकरिता त्यांच्या त्वचेचा वापर करतात.
9- भारतामध्ये आढळणाऱ्या किंग कोब्रा सापाचे विष इतके विषारी आहे की तो त्याच्या चाव्याने किंवा विषाने मोठ्या हत्तीला देखील मारू शकतो.
10- जगातील सर्वात लहान आकाराचा साप हा लेप्टोटाइफ्लॉप्स कार्ले असून त्याचा आकार फक्त चार किंवा पाच इंचाचा असू शकतो.
11- आपण बऱ्याचदा सर्पमित्राच्या तालावर नाचताना सापाला पाहतो. परंतु यामागे आश्चर्याची गोष्ट म्हणजे सापाला ऐकूच येत नाही. तो फक्त बिनची जी काही हालचाल होत असते त्या हालचालीनुसार हलत असतो त्यालाच आपण साप नाचत आहे असे समजतो.
12- अंतरदेशीय तैपन सापाच्या विषामध्ये एका वेळी 80 लोकांना मारण्याची क्षमता आहे.
13- साप वर्षातून अनेक वेळा स्वतःची जुनी त्वचा बदलत असतो व त्याला आपण मोलस्क म्हणतो.
14- साप जेव्हा त्याला धोका वाटतो तेव्हा माणसांप्रमाणे उलट्या करतो व त्यामुळे त्याचे शरीर हलके होते व तो वेगाने धावू शकतो.
15- यामध्ये दोन डोके असलेल्या सापांच्या अनेक प्रजाती आहेत व ही दोन्ही डोकी अन्नासाठी एकमेकांमध्ये भांडू शकतात.
16- साप नाकातून नाहीतर जिभेने वासाची ओळख करू शकतो व जिभेच्या साह्याने तो आसपासचा परिसर देखील ओळखतो.
17- अनेक प्राणी किंवा पक्षांना आपण थोडेफार प्रशिक्षण दिले तर ते बऱ्याच गोष्टी शिकू शकतात. परंतु सापांच्या बाबतीत हे होऊ शकत नाही. कारण शिकण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण करण्यासाठी मेंदूमध्ये असलेले सेरेब्रल गोलार्ध सापांच्या मेंदूमध्ये नसते.
18- जगातील सर्वात लहान साप हा थ्रेड साप आहे जो कॅरिबियन समुद्रातील सेंट लुसिया आणि बार्बाडोस बेटांवर आढळतो. त्याची लांबी दहा ते बारा सेंटीमीटर इतकी असते.
19- 70 टक्के सापांच्या प्रजाती अंडी घालतात आणि उरलेल्या 30% प्रजाती अंडी न घालता पिलांना जन्म देतात.
20- फ्लावर पॉट साप हा हर्माफ्रोडाइट साप आहे म्हणून त्याला पुनरुत्पादनाकरिता मादी जोडीदाराची आवश्यकता नसते.
21- ॲनाकोंडा जातीचा साप पाण्याखाली दहा मिनिटे श्वास रोखू शकतो.
22- असे मानले जाते की डायनासोरच्या काळापासून सापांच्या अनेक प्रजाती या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत.
23- मृत झालेल्या सापाचे मृत डोके त्याच्या मृत्यूनंतर काही तासांनी देखील chau शकते.
24- दक्षिण आफ्रिकेत आढळणाऱ्या होर्नेड वायपर या जातीच्या सापाच्या डोक्यावर दोन शिंगे असतात म्हणून त्याला Horned वायपर स्नेक असे देखील म्हटले जाते.