स्पेशल

Mhada Lottery 2024: सोलापूर,कोल्हापूर आणि पुणेकरांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा ‘या’ कालावधीत काढणार 5000 घरांसाठी सोडत

Published by
Ajay Patil

Mhada Lottery 2024:- स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे हे आजकालच्या महागाईच्या कालावधीमध्ये जवळपास अशक्य अशी गोष्ट आहे. पुणे आणि मुंबई सोबतच इतर मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करणे तर जवळपास अशक्यप्राय बाब आहे. परंतु नागरिकांचे स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून खूप मोठी मदत होत असते.

या दोन्ही गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून सोडत काढण्यात येते व या माध्यमातून नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अगदी याच अनुषंगाने आता सोलापूर तसेच कोल्हापूर व पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी असून म्हाडाच्या पुणे मंडळाच्या माध्यमातून आता तब्बल 5000 घरांसाठी सोडत काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला असून

साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती समोर आलेली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज विक्री व यांची स्वीकृती इत्यादी प्रक्रिया राबवून डिसेंबरमध्ये या सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर तसेच कोल्हापूर व पुणे सारख्या शहरांमध्ये स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांकरिता ही एक पर्वणी ठरणार आहे.

 पुणे मंडळांने 2024 मध्ये आतापर्यंत काढल्या दोन सोडत

म्हाडाच्या मुंबई मंडळापाठोपाठ पुणे मंडळांने देखील मागील काही वर्षांपासून घरांसाठीच्या सोडती काढल्या असून यावर्षी आतापर्यंत दोन सोडत काढण्यात आलेल्या आहेत व आता या तिसऱ्या सोडतीची तयारी पुणे मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार  आता यात तिसऱ्या सोडतीमध्ये जवळपास 5000 घरांसाठी ही सोडत काढण्यात येणार असून त्यासाठीची आवश्यक तयारी ही आता अंतिम टप्प्यात असून 3 ऑक्टोबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्याचे पुणे मंडळाच्या माध्यमातून नियोजन आहे.

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ताबडतोब अर्ज विक्री आणि स्वीकृती  प्रक्रियेला देखील सुरुवात करण्यात येणार असून 45 दिवस ही प्रक्रिया सुरू राहील व त्यानंतर सोडतीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. परंतु विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे पुणे मंडळाकडून सोडतीचा निकाल जाहीर करणे शक्य होणार नाही.

परंतु जर निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन म्हाडा नोव्हेंबर अखेरीस या सोडतीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न देखील करू शकते अशी देखील माहिती समोर आलेली आहे. परंतु जर अशा प्रकारची परवानगी देण्यात आली नाही तर ही सोडत डिसेंबर मध्येच करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 कोणत्या ठिकाणी मिळतील ही घरे?

पुणे मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या 5000 घरांच्या सोडतीमध्ये सोलापूर, पुणे आणि कोल्हापूर येथील घरांचा समावेश असणार आहे. म्हाळुंगे तसेच ताथवडे येथील म्हाडाच्या विकल्या न जाणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेतील घरांचा देखील या सोडतीमध्ये समावेश केला जाणार आहे.

यात ताथवडेतील 418 आणि म्हाळुंगे येथील 1300 प्रथम प्राधान्य योजनेतील घरांचा समावेश आहे. यासोबतच 20% योजनेतील सदनिकांची संख्या 2500 ते 3000 च्या आसपास असण्याची शक्यता आहे.

कागल मधील 320 घरे ही पंतप्रधान आवास योजनेतील असून तळेगाव मधील पीएमवायए योजनेतील जवळपास 150 घरांचा देखील या सोडतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. सोलापूरकरांसाठी या सोडतीत 170 घरे असणार आहे.यामध्ये संत तुकाराम नगर मधील 32 आणि सासवड मधील 79 घरांचा या सोडतीत समावेश असणार आहे.

Ajay Patil