Solar Panel Subsidy : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. गत काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईने भरडली जात आहे. वाढत्या वीज बिलाचा देखील सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय.
यामुळे सर्वसामान्य नागरिक विज बिलापासून मुक्तता मिळावी यासाठी घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यास प्राधान्य दाखवत आहेत. महत्त्वाचे म्हणजे सरकारकडूनही घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
त्यासाठी सरकारने पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे.
याच्या माध्यमातून एक किलो वॅट पासून ते तीन किलो वॅट पर्यंतचे सोलर पॅनल घराच्या छतावर बसवता येत असून यामुळे सर्वसामान्यांना 120 ते 360 युनिट पर्यंतची मोफत वीज उपलब्ध होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रात आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 6341 घरगुती वीज ग्राहकांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. एवढेच नाही तर सादर झालेल्या प्रस्तावांपैकी एक हजार 601 सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.
या संबंधित घरगुती वीज ग्राहकांना अनुदानाचा पैसा देखील मिळाला आहे. या लोकांना बँकांच्या माध्यमातून परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी अनुदान सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे.
या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल इंस्टॉल केलेल्या ग्राहकांकडे गरजेपेक्षा अधिक वीज शिल्लक राहिल्यास ती वीज महावितरणकडून विकत घेण्यात घेत आहे.
व याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. दरम्यान आता आपण या योजनेअंतर्गत किती किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी किती अनुदान उपलब्ध करून दिले जाते या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
किती अनुदान मिळते?
केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत घरगुती वीज ग्राहकांना 1 किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, 2 किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि 3 किलोवॉट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान दिले जात आहे.