Solar Panel Subsidy : तुम्हीही वाढत्या विज बिलामुळे संकटात सापडला आहात का ? अहो मग आजची बातमी विशेष तुमच्यासाठी. खरे तर सध्या उन्हाळा सुरू आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू असल्याने कमाल तापमानाचा पारा 40°खाली आला आहे. मात्र आगामी काळात हा पारा आणखी वाढणार आहे आणि पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत एसी, फ्रिज, कुलर, फॅन अशा विविध उपकरणांचा वापर आता वाढणार आहे. या इलेक्ट्रिक उपकरणांमुळे मात्र तुमच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. किंबहुना कात्री बसायला सुरुवात झाली आहे. मग आता या वाढत्या विजबिलापासून मुक्त कसे व्हायचे हाच मोठा प्रश्न आहे. पण आता चिंता करू नका, जर तुम्हीही वाढत्या वीज बिलामुळे संकटात आला असाल आणि वाढत्या वीज बिलाच्या या संकटातून मुक्त होण्याच्या प्रयत्नात असाल तर तुमच्यासाठी सोलर पॅनल हा चांगला ऑप्शन ठरणार आहे.
विशेष बाब म्हणजे सोलर पॅनल बसवण्यासाठी शासन तुम्हाला अनुदानही देत आहे. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून वीज तयार करू शकता आणि या विजेचा वापर तुमच्या घरासाठी होणार आहे. यामुळे तुमचे वीज बिल शून्यावर येणार आहे. तुम्ही घरातील सर्व उपकरण सहजतेने वापरू शकणार आहात.
विजेसाठी तुम्हाला एक रुपया देखील खर्च करावा लागणार नाही. मात्र सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येतो? यावर किती अनुदान मिळतं? शासनाच्या कोणत्या योजनेचा यासाठी फायदा होतो असे नानाविध प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाले असतील. दरम्यान आज आपण या साऱ्या प्रश्नांचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाच्या योजनेचा फायदा मिळणार
केंद्रातील सरकारने आत्तापर्यंत सर्वसामान्यांसाठी शेकडो योजना राबवल्या आहेत. यामध्ये अलीकडेच सुरू झालेल्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा देखील समावेश होतो. ही योजना केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून याची घोषणा 22 जानेवारीला झाली होती. पंतप्रधानांनी 22 जानेवारी अर्थातच श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर या योजनेची घोषणा केली. त्यावेळी पीएम मोदी यांनी या योजनेला पीएम सूर्योदय योजना असे म्हटले होते.
पण आता या योजनेचे नाव बदलले गेले आहे. याला पीएम सूर्य घर मोफत वीज योजना असे संबोधले जात आहे. याचे अधिकृत पोर्टलही सुरू झाले आहे. तसेच या योजनेसाठीच्या अर्ज प्रक्रियेला देखील सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने देशभरातील एक कोटी कुटुंबांना महिन्याकाठी 300 युनिट पर्यंतची मोफत वीज पुरवण्याचे धोरण निश्चित केलेले आहे. या अंतर्गत देशातील नागरिकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
त्यामुळे जर तुम्ही तुमच्या घरावर किंवा दुकानावर सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार आहे. तुम्ही गावात अथवा शहरात कुठेही राहत असाल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र या योजनेचा लाभ ज्या व्यक्तीच्या नावावर स्वतःचे घर आहे अशाच व्यक्तींना मिळणार आहे. फ्लॅटमध्ये राहणाऱ्यां नागरिकांना याचा लाभ घेता येणार नाही. कारण की सोलर पॅनल बसवण्यासाठी लाभार्थ्याकडे त्याच्या घराच्या छतावर जागा असणे आवश्यक आहे. दरम्यान आता आपण या योजनेअंतर्गत सोलर पॅनल साठी किती अनुदान मिळते हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
सोलर पॅनलसाठी किती अनुदान मिळणार
केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी सोलर पॅनल च्या क्षमतेनुसार अनुदान पुरवले जाते. यात एक किलो वॅट क्षमता असलेले सोलर पॅनल इंस्टॉल करण्यासाठी तीस हजार रुपये, दोन किलो वॅट क्षमता असलेल्या सोलर पॅनलसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलो वॅट क्षमता असलेल्या किंवा तीन किलोवॅटपेक्षा जास्त परंतु दहा किलो वॅट पर्यंतच्या सोलर पॅनल साठी 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
किती खर्च करावा लागतो
मिळालेल्या माहितीनुसार, 2 किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसवण्यासाठी 1.25 लाख रुपये खर्च येतो. तसेच 3 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवण्यासाठी सुमारे 2 लाख रुपये खर्च येतो. पण, शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा लाभ घेतल्यास दोन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी ग्राहकांना 90 हजार रुपयांपर्यंत आणि तीन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी एक लाख 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागतो.
तथापि येथे सोलर पॅनलचा दिलेला खर्च हा अंदाजित आहे. किमतीमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होऊ शकतो. यामुळे जर तुम्हीही सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला अनुदानासाठी नोंदणीकृत असलेल्या तुमच्या जवळील डीलरसोबत संपर्क साधावा लागणार आहे. अधिकृत विक्रेत्याकडून या योजनेबाबत आणि सोलर पॅनल बाबत अधिकची माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता.