Soyabean Price : सोयाबीन उत्पादकांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मार्च एंडिंग ला सोयाबीन दरात वाढ होण्याचा अंदाज बाजार अभ्यासकांनी वर्तवला आहे. दरवाढीसाठी काही कारणे देखील बाजार अभ्यासकांनी सांगितले आहेत. खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन पेरणी दिवसेंदिवस वधारत आहे.
सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक असल्याने आणि शाश्वत उत्पादन यापासून मिळत असल्याने अलीकडे याची पेरणी शेतकऱ्यांनी वाढवली आहे. गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला भाव देखील मिळाला होता. अशा परिस्थितीत यंदाही सोयाबीन चांगला दरात विक्री होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती.
परंतु अगदी हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीन दर दबावात आहेत. राज्यात सध्या पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत सोयाबीन विक्री होत आहे. काही बाजारात तर याहीपेक्षा कमी दर मिळत आहे. वास्तविक मार्च एंडिंग ला व्यापारी लोक आपला साठवलेला सोयाबीन विक्री करतात तसेच शेतकरी बांधव देखील बँकेची तसेच काही इतर प्रलंबित देणी भरण्यासाठी सोयाबीन विक्री करत असतात. सध्या स्थितीला मात्र सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्याने सोयाबीन विक्री शेतकऱ्यांसाठी परवडणारी नाहीये.
अशातच एल निनोमुळे सध्या ज्या काही चर्चा सुरू आहेत याचा सोयाबीन दरास फायदा होणार आहे. या चर्चांमुळे पुढील वर्षी सोयाबीन उत्पादनात घट होईल अशी भीती उद्योगांना जाणवेल परिणामी आता सोयाबीनची मागणी वाढेल आणि दरवाढही होईल असा अंदाज बाजार अभ्यासक वर्तवत आहेत. दरम्यान ॲलनिनो बाबत आतापासूनच अंदाज वर्तवणे घाईचे असल्याचे मत भारतीय वैज्ञानिकांनी व्यक्त केलं आहे.
तर काही वैज्ञानिकांनी एल निनो जर आला तर दहा पैकी केवळ पाचदाच यामुळे कमी पाऊस पडतो अन इतर पाच वेळेस सरासरी इतका पाऊस पडत असतो असं सांगितलं आहे. यासोबतच प्रमुख सोयाबीन उत्पादक देश अर्जंटीना मध्ये दुष्काळ पडला असल्याने त्या ठिकाणी सोयाबीन उत्पादन कमी होणार आहे. यामुळे त्या ठिकाणाहुन सोया पेंड निर्यात कमी होत आहे. यामुळे जागतिक बाजारात सोया पेंड दर वाढले आहेत.
परिणामी देशातील सोया पेंडला मागणी वाढली आहे. यामुळे याचा देखील सोयाबीन दराला फायदा होणार आहे. निश्चितच सोयाबीन दरवाढीसाठी पोषक परिस्थिती असल्याने सोयाबीन उत्पादकांना येत्या काही दिवसात याचा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. जाणकार लोकांनी शेतकऱ्यांना साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करू नये असा सल्ला यावेळी दिला आहे.