Soyabean Price Hike : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणारा एक मुख्य नगदी पीक. शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने अलीकडे या पिकाच्या लागवडीखालीलक्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनाकडून सोयाबीनला चार हजार 350 रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव लावून देण्यात आला आहे.
शासनाने लावून दिलेल्या हमीभावापेक्षा सध्याचा दर 1100 ते 1200 रुपये प्रति क्विंटल अधिक आहे. यामुळे बाजारात सोयाबीन दरात तेजी असल्याचे सांगितले जात आहे. पण असे असले तरी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव सध्या मिळत असलेल्या दारात सोयाबीन विक्रीसाठी नाखुष आहे. सोयाबीन उत्पादकांनी सद्यस्थितीला विक्री ऐवजी आता दरवाढीच्या आशेने साठवणूक सुरू केली आहे.
शेतकऱ्यांच्या मते सध्या मिळत असलेल्या दर निश्चितच हमीभावापेक्षा अधिक भासत आहे. पण या खरीप हंगामात सुरुवातीला लांबलेला मान्सून, जुलै ऑगस्ट मध्ये झालेली अतिवृष्टी, सप्टेंबर मध्ये सततचा पाऊस आणि ऑक्टोबर महिन्यात कोसळलेला परतीचा पाऊस यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
उत्पादनात तर घट झालीचं शिवाय हवामानातील या विपरीत बदलामुळे सोयाबीन पीक जोपासणीसाठी अधिक खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट पाहायला मिळाले, सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये शेतात पाणी साचले असल्याने सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात पिवळे पडले होते. परिणामी सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी केली.
वेगवेगळ्या खतांचा आणि टॉनिकचा वापर पिकासाठी करण्यात आला. अशा परिस्थितीत सोयाबीन पीक उत्पादित करण्यासाठी क्विंटल मागे 5,200 चा खर्च आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे किमान 7000 रुपये प्रति क्विंटल दर सोयाबीनला मिळाला पाहिजे असे शेतकऱ्यांचे मत आहे.
दरम्यान सद्यस्थितीला महाराष्ट्रातील खुल्या बाजारात सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास दर मिळत आहे. त्यामुळे हा दर हमीभावापेक्षा अधिक भासत असला तरी देखील शेतकऱ्यांसाठी परवडणारा नसून यामुळे उत्पादन खर्च देखील वसूल होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान आता सोयाबीन उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक अशी बातमी देखील समोर आली आहे.
खर पाहता चायना मधून सोयाबीनला मागणी वाढत असल्याने तसेच प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र अर्जेंटिना मध्ये पाऊसमान कमी असल्याने त्या ठिकाणी सोयाबीन उत्पादनात होणारी घट या परिस्थिती सोयाबीन दर वाढीसाठी पूरक असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे भविष्यात दरात 200 ते 300 रुपयांची वाढ होऊ शकते असा जाणकारांनी अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. केंद्र सरकारने आता देशात सोयाबीन तेल आयात करण्यासाठी शुल्क आकारला जाईल असे स्पष्ट केले आहे.
खरं पाहता 2022 मध्ये सोया तेलाचे दर वधारले होते यामुळे विना आयात शुल्क सोया तेल आयात केल जात होतं. दरम्यान आता या निर्णयामुळे सोयातेल आयातीसाठी शुल्क लागणार आहे. यामुळे याचा अप्रत्यक्ष फायदा सोयाबीन दराला होणार आहे.