Soyabean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खरीप हंगामात पिकवल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. एका शासकीय आकडेवारीनुसार देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी महाराष्ट्रात 40 टक्के उत्पादन घेतले जाते. राज्याचा एकूण सोयाबीन उत्पादनात देशात दुसरा क्रमांक लागतो. यावरूनच राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीनवर किती अवलंबित्व आहे हे स्पष्ट होतं. वास्तविक गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन ची शेती वधारत आहे.
विशेष म्हणजे शाश्वत उत्पादन आणि चांगला दर यामुळे सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत आहे. गेल्या वर्षी पर्यंत अशीच परिस्थिती होती. यंदा परिस्थिती मात्र पूर्णपणे बदलली आहे. हंगाम सुरू होऊन जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे तरी देखील बाजारात सोयाबीनचे दर दबावातच आहेत. यामुळे सोयाबीन पीक शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा व्यवहार यावर्षी सिद्ध होत आहे.
सध्या जागतिक आणि देशांतर्गत बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार सुरूच आहे. सोयाबीन दर दबावात राहण्यामागे अनेक कारणे होती यापैकी एक मुख्य कारण खाद्यतेलाची विनाशुल्क आयात याला देखील मानला गेला आहे. मात्र आता केंद्र शासनाने सोयातेल पाठोपाठच सूर्यफूल तेलाचे देखील विना आयातशुल्क आयात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता सूर्यफूल तेल आयात करण्यासाठी देखील शुल्क आकारला जाणार आहे. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत सूर्यफूल तेलाचे दर वधारणार आहेत. यामुळे सोयाबीन समवेतच इतर खाद्यतेलाचे दरही वधारू शकतात.
अशा परिस्थितीत याचा परिणाम म्हणून तेलबियाचे भाव वाढतील असा अंदाज बाजार अभ्यासकांनी वर्तवला आहे. खरं पाहता केंद्र शासनाने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वाढलेले खाद्यतेल नियंत्रणात आणण्यासाठी मे 2022 मध्ये सोया तेल आणि सूर्यफूल तेल विनाशुल्क आयातीसाठी परवानगी दिली. वीस लाख टन कच्चे सोयाबीन तेल आणि वीस लाख टन कच्चे सूर्यफूल तेल विना आयात शुल्क इम्पोर्ट करण्यासाठी शासनाने ही परवानगी दिली होती. ही परवानगी दोन वर्षांसाठी देण्यात आली होती.
अशातच रशिया आणि युवकऱ्यांनी आपला सूर्यफुल तेलाचा साठा कमी करण्यासाठी कच्चे तेलाचे दर कमी केलेत. याचा परिणाम म्हणून भारतात जानेवारी महिन्यामध्ये विक्रमी पातळीवर सूर्यफूल तेलाची आयात झाली. यामुळे सोयाबीन तेल आणि मोहरी तेल दबावात आले. परिणाम म्हणून तेलबिया दरही कमी झाले. सोयाबीन तेलाचे दर कमी झाल्यानंतर मात्र केंद्र शासनाने जानेवारी 2023 मध्ये सोया तेल विनाशुल्क आयात करण्याचा आपला निर्णय रद्द केला. नवीन अध्यादेश काढत 1 एप्रिल 2023 पासून कच्चे सोयातेल आयातीसाठी शुल्क लागू केले.
मात्र कच्चे सूर्यफूल तेल आयात विनाशुल्कच चालू ठेवली. याचा परिणाम म्हणून देशातील खाद्यतेल उद्योगावर संकट आले. यामुळे उद्योगाकडून सूर्यफूल तेल आयात करण्यासाठी पुन्हा शुल्क लागू करावे अशी मागणी केली जाऊ लागली. शेतकऱ्यांकडून देखील ही मागणी जोर धरत होती. अशा परिस्थितीत एक मार्च रोजी सूर्यफूल तेल आयातीसाठी शुल्क आकारण्याचा पुन्हा एकदा निर्णय घेण्यात आला. आता 31 मार्च 2023 पासून सूर्यफूल तेल आयातीसाठी शुल्क लागणार आहे. म्हणजेच आता कच्चे सूर्यफूल तेल आणि कच्चे सोयाबीन तेल आयातीसाठी शुल्क लागणार आहे.
हा निर्णय 31 मार्च आणि एक एप्रिल 2023 पासून अनुक्रमे लागू राहणार आहे. मात्र असे असले तरी खाद्य तेलाला आधार मिळण्यासाठी उद्योगांकडून आयात शुल्क वाढवण्याची मागणी होत आहे. जर शासनाने हाही निर्णय घेतला तर सोयाबीन दराला आधार मिळू शकतो असा अंदाज बाजार अभ्यासक वर्तवत आहेत. सध्या सोयाबीन 5300 प्रतिक्विंटल च्या दरम्यान विक्री होत आहे. मात्र आगामी काही दिवसात यामध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ होण्याची अशी आहे. साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सोयाबीनला दर मिळेल असा अंदाज तज्ञ वर्तवत आहेत.