Soyabean Rate Will Increase : गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला होता. परिणामी या हंगामात राज्यात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढले. मात्र अतिवृष्टी आणि कीटकांच्या आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली. एकरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसला.
शिवाय बाजारभाव देखील अपेक्षित मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी या हंगामात पाहायला मिळत आहे. दरम्यान आता सोयाबीन उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता दरवाढ होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होत आहे. यंदा अर्जेंटिना मध्ये सोयाबीन उत्पादन कमी होणार आहे. वास्तविक अर्जेंटिना सोयाबीनची निर्यात कमी प्रमाणात करतो मात्र सोया पेंड निर्यात सर्वाधिक करत असतो.
अशा परिस्थितीत सोया पेंड निर्यात अर्जेंटिना मधून कमी होणार आहे यामुळे भारतीय सोया पेंड मागणीमध्ये आहे. खरं पाहता अर्जेंटिनामध्ये उत्पादन कमी झाले आणि ब्राझीलमध्ये उत्पादन वाढले मात्र ब्राझील हा सोयाबीनची निर्यात जास्त करतो. ब्राझील मधून सोया पेंड निर्यात खूपच कमी होते. यामुळे भारतीय सोया पेंड बांगलादेश, जपान, व्हिएतनाम आदी देशांत मागणीमध्ये असून याचा फायदा सोयाबीन उत्पादकांना आता होऊ शकतो असा दावा तज्ज्ञांचा आहे.
देशातून सोया पेंड निर्यात वाढत असल्याने सोयाबीन दरवाढीसाठी पोषक परिस्थिती असली तरीही बाजारात सोयाबीनची आवक वाढत असल्याने याचा दबाव दरावर बनला आहे. यासोबतच खाद्यतेलदराचाही सोयाबीन दरावर दबाव आहे. यामुळे खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी उद्योगाची आहे आणि शेतकऱ्यांनी देखील याचा पाठपुरावाच केला आहे. दरम्यान सोया पेंड निर्यात तेजीत राहणार आहे. त्यामुळे उद्योगांना सोयाबीन खरेदी वाढवावी लागणार आहे.
अशातच सोयाबीनची आवक पुढील काही दिवस कायम राहील आणि त्यानंतर आवक कमी होईल अशी शक्यता आहे. यामुळे दर वधारले तरी देखील शेतकऱ्यांना याचा किती फायदा होतो ही एक विश्लेषणात्मक बाब राहणार आहे. कारण की, शेतकऱ्यांकडे असलेला माल हा बहुतांशी विक्री झाला असून आता काही मोजक्याच शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे.
यामुळे दरवाढीचा फायदा खूपच कमी शेतकऱ्यांना होईल अशी शक्यता देखील आहे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडील सोयाबीन साठा कमी झाला असल्याने दरात तेजीची शक्यता आहे. त्यासोबतच सोयापेंड निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे यामुळे देखील दर वाढ होऊ शकते. आणखी काही कारणे दरवाढीसाठी पोषक ठरणार आहेत ती खालील प्रमाणे:-
एप्रिलमध्ये निर्यात विक्रमी होण्याची शक्यता आहे
बाजारातील आवक कमी होण्याचा अंदाज
सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्क वाढीचा अंदाज
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर पूर्वपातळीकडे
सोयापेंड दरही मंदीतून सावरले
शेजारील देशांची सोयापेंडसाठी भारताला पसंती
हे पण वाचा :- आनंदाची बातमी! मुंबई महापालिकेत नव्याने ‘या’ पदासाठी भरती सुरु; पगार मिळणार तब्बल 40 हजार, पहा अर्ज करण्याची पद्धत्त