स्पेशल

Soybean Market Price : खरं काय ! ‘या’ ठिकाणी सोयाबीनला मिळतोय 10 हजाराचा भाव, पहा सविस्तर

Published by
Ajay Patil

Soybean Market Price : सोयाबीन हे संपूर्ण भारतात उत्पादित केल जाणारा एक मुख्य पीक आहे. खरीप हंगामात या पिकाची सर्वाधिक शेती केली जाते. अलीकडील काळात उन्हाळी हंगामातही सोयाबीनची पेरणी शेतकरी करू लागले आहेत. आपल्या राज्यात उन्हाळी सोयाबीन लागवडीचा प्रयोग केला दोन वर्षांपासून केला जात आहे. हा प्रयोग विशेषता बिजोत्पादनासाठी केला जात असला तरी अनेक शेतकरी बांधव यातूनही उत्पादन घेत आहेत.

दरम्यान यंदाच्या खरीप हंगामात उत्पादित झालेले सोयाबीन सध्या बाजारात कवडीमोल दरात विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. खरं पाहता, गत हंगामात सोयाबीन आठ हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दरात विक्री झाले. यामुळे या हंगामातही असाच काहीसा बाजार भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.

मात्र तसं काही झालं नाही. मध्यंतरी सोयाबीनला या हंगामात सहा हजार रुपये दर नमूद करण्यात आला मात्र तूर्तास साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी दरात सोयाबीन विक्री होत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. दरम्यान जाणकार लोकांनी सोयाबीन दरात वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे.

जाणकार लोकांच्या मते भारत सरकारने 1 एप्रिल 2023 पासून कच्चं सोयातेल आयातीसाठी शुल्क आकरण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे गेल्या वर्षी मे मध्ये जो निर्णय झाला होता विनाशुल्क सोयातेल आयातीचा तो निर्णय एक एप्रिल पासून रद्द होणार आहे. यामुळे सोयाबीन तेलाच्या दराला आधार मिळेल अन याचा परिणाम म्हणून सोयाबीन दरातही वाढ होईल असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.

शिवाय चायना मधूनही मागणी वाढू शकते, यामुळे जागतिक बाजारात सोयाबीन दरात अजून तेजी येण्याची शक्यता आहे. तसंच काही जाणकार लोकांनी अर्जेंटिना आणि ब्राझील या दोन प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रात जी काही दुष्काळाची परिस्थिती तयार झाली आहे त्यामुळे त्या ठिकाणी सोयाबीन पिकाचे उत्पादनात घट होणार असल्याचा दावा केला आहे.

जागतिक सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिना ही तीन राष्ट्र प्रथम तीन मध्ये येतात. अमेरिकेचे सोयाबीन बाजारात आपल्या भारताच्या सोयाबीन सोबतचं दाखल होत असते. मात्र अर्जेंटिना आणि ब्राझीलचे सोयाबीन सध्या शेतातच उभे आहे. अशातच त्या ठिकाणी दुष्काळासारखी परिस्थिती तयार झाली आहे.

विशेषता अर्जेंटिनामध्ये कमी पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे देखील सोयाबीन दर वाढीसाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा दावा जानकारांनी केला आहे.

दरम्यान आपल्या महाराष्ट्रात सोयाबीन साडेपाच हजार रुपयेच्या आसपास विक्री होत असले तरीदेखील मणिपूरमध्ये परिस्थिती थोडीशी भिन्न आहे. मणिपूरमध्ये सोयाबीन दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या दरात विक्री होत आहे. विशेष म्हणजे सरासरी तर 8500 ते 9700 पर्यंत नमूद केला जात आहे.

13 जानेवारी बिशनपूर एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 10 हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला, 9400 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला तसेच 9700 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव नमूद झाला.

याशिवाय ईम्फाल एपीएमसीमध्ये सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल कमाल 9000 रुपये प्रति क्विंटल किमान 9500 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

लांबलोंग बाजार मध्ये सोयाबीनला नऊ हजार रुपये कमाल, आठ हजार रुपये किमान आणि साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मणिपूरमध्ये खूपच कमी प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतल जात. त्या ठिकाणी कमी सोयाबीन उत्पादित होत असल्यामुळे आणि दर्जेदार सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे सोयाबीनला नेहमीच अधिक दर मिळतो. मात्र त्या ठिकाणी सोयाबीनचे उत्पादन खूपच नगण्य आहे. 

Ajay Patil