स्पेशल

Soybean Market Update : जागतिक बाजारातून शेतकऱ्यांना आली गुड न्यूज ! सोयाबीन दरातील तेजी कायम, देशांतर्गतही वाढणार?

Published by
Ajay Patil

Soybean Market Update : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आज जागतिक बाजारातून एक गुड न्यूज समोर आली आहे. जागतिक बाजारात सोयाबीन दरात आजही तेजी नमूद करण्यात आली आहे. सोया पेंड आणि सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात आजही तेजीत असल्याने देशांतर्गत सोयाबीन दरात वाढ होईल असा अंदाज तज्ञांना होता. मात्र सद्यस्थितीत देशांतर्गत सोयाबीन दर दबावात आहेत.

आज महाराष्ट्रातील वरोरा माढेली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर सोयाबीन दर पाच हजाराच्या खाली नमूद करण्यात आलेत. परंतु कृषी क्षेत्रातील तज्ञांनी जागतिक बाजारात दरवाढ होत असल्याने लवकरच देशांतर्गत सोयाबीन दर कडाडतील आणि उत्पादकांना दिलासा मिळेल असा आशावाद बोलून दाखवला आहे.

दरम्यान प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र अर्थातच अर्जेंटिना मध्ये भीषण होत चाललेली दुष्काळी परिस्थिती भविष्यात जागतिक बाजारात सोयाबीन दरवाढीसाठी पूरक ठरणार असल्याचा दावा काही लोकांनी केला आहे. अर्जेंटिनामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पावसाभावी त्या ठिकाणी सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचा दावा काही जाणकारांनी केला आहे.

विशेष म्हणजे अमेरिकेच्या कृषी विभागाने देखील याला दुजोरा दिला आहे. मात्र अमेरिकेच्या कृषी विभागाने अजूनही अपेक्षित अशी घट अर्जेंटिनाच्या सोयाबीन उत्पादनात दाखवलेली नाही.  मात्र काही तज्ञ लोकांनी अमेरिकेच्या कृषी विभागाने जेवढी घट दाखवली आहे त्यापेक्षा अधिक घट सोयाबीन उत्पादनात त्या ठिकाणी होईल असा दावा केला आहे.

अमेरिकन कृषी विभागाने गेल्या महिन्यात 495 लाख मेट्रिक टन सोयाबीन उत्पादन अर्जेंटिना मध्ये होईल असं सांगितलं, मात्र या महिन्याच्या सुधारित अहवालात हा अंदाज कमी केला आणि 455 लाख मेट्रिक टन सोयाबीन उत्पादन होणार असं भाकीत वर्तवलं.

जाणकार लोकांनी मात्र यापेक्षा अधिक घट होणार असल्याचा दावा केला असल्याने कुठे ना कुठे सोयाबीन दरवाढीसाठी भविष्यात पूरक परिस्थिती निर्माण होईल आणि याचा इनडायरेक्ट फायदा देशांतर्गत बाजारात होईल आणि साहजिकच सोयाबीन उत्पादकांची दरवाढीची आशा फलश्रूतीस येईल असा आशावाद यावेळी व्यक्त होत आहे.

दरम्यान अमेरिकेच्या कृषी विभागाने आपला नवीन अहवाल सादर केला आणि अर्जंटीनामध्ये सोयाबीन उत्पादन घटेल असं सांगितलं अन लगेच सीबॉटवर सोयाबीन वायद्यांमध्ये दोन दिवसांपासून वाढ होत आहे. देशांतर्गत मात्र पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे दरम्यान दर मिळत आहे.

प्रक्रिया उद्योगातील दर 100 ते 200 रुपये अधिक आहेत. जागतिक बाजारात सोयापेंड आणि सोयाबीन दरात वाढ झाली असल्याने याचा देशांतर्गत सोयाबीन दराला फायदा होईल आणि लवकरच 200 ते 300 रुपयांची वाढ होईल असं जाणकारांकडून वर्तवण्यात आल आहे.

Ajay Patil