स्पेशल

Soybean Price : भारतीय शेतकऱ्यांसाठी चीनमधून आली गुड न्यूज ! चीन करणार ‘हे’ काम, म्हणून सोयाबीन दरात होणार विक्रमी वाढ

Published by
Ajay Patil

Soybean Price : सोयाबीन हे संपूर्ण भारतात उत्पादित केला जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. आपल्याकडे या पिकाची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. महाराष्ट्रात देखील या पिकाची लागवड विशेष उल्लेखनीय असून देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात राज्याचा 40% एवढा वाटा आहे. शिवाय गत हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाला असल्याने महाराष्ट्रात सोयाबीनचा पेरा वाढला आहे.

यंदा मात्र चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेने सोयाबीनची पेरणी वाढली असली तरी देखील शेतकऱ्यांना याचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे. खरं पाहता यंदा सुरुवातीपासून सोयाबीन दर दबावत आहेत. मध्यंतरी सोयाबीन 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या सरासरी दरात विकला जात होता. मात्र तदनंतर दरात घसरण झाली.

सद्यस्थितीला सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विकला जात आहे. दरम्यान, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी चीन मधून समोर येत आहे. ती म्हणजे सोयाबीनचे आयात चीनमध्ये वाढणार असून यामुळे इनडायरेक्ट भारतीय सोयाबीन दराला आधार मिळणार आहे. खरं पाहता चीन हा कापूस आणि सोयाबीनचा प्रमुख ग्राहक आहे.

त्या ठिकाणी असलेल्या मागणीवरच कापूस आणि सोयाबीनचे दर जागतिक बाजारात ठरत असतात. एकंदरीत जागतिक बाजाराचे अवलंबित्व चीनवर सर्वाधिक आहे. मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे चीनची आर्थिक हालत खराब होती शिवाय निर्बंधामुळे देखील त्या ठिकाणी सोयाबीन आयातीसाठी प्रॉब्लेम येत होते. यामुळे गेल्या वर्षी 5.6% सोयाबीनची कमी आयात झाल्याचे नमूद झाले. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो 2021 मध्ये चीनने 960 लाख टन सोयाबीन आयात केली.

यानंतर गेल्या वर्षी 2022 मध्ये 910 लाख टन सोयाबीन आयात झाली. आयातीमध्ये घट झाली. गेल्या वर्षी चीनमध्ये पशुखाद्यात सोया पेंड चा वापर कमी झाला होता. यंदा मात्र परिस्थिती बदलणार आहे. चीनमध्ये सोयाबीनची मागणी वाढण्याची तज्ञ लोकांनी आशा व्यक्त केली आहे. खरं पाहता 21 जानेवारीपासून चीनमध्ये नववर्षाला सुरुवात होते.

यामुळे पोल्ट्री आणि वऱ्हाहपालन उद्योगांमध्ये सोया पेंड पशुखाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाण्याची शक्यता आहे. आणि सध्या चायना मध्ये सोयाबीन साठा कमी आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात सोयाबीन त्या ठिकाणी आयात होणार आहे. एकंदरीत 2023 मध्ये सोयापेंड, सोयाबीनची आयात चीनमध्ये वाढणार आहे.

याचा आधार सोयाबीन दराला जागतिक बाजारात मिळेल. जागतिक बाजारात दर वाढ झाल्यानंतर साहजिकच देशांतर्गत याचा मोठा फायदा होईल आणि भारतीय शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कुठे ना कुठे अधिक दर मिळेल.

Ajay Patil