स्पेशल

Soybean Price Maharashtra : अखेर, सोयाबीन दर साडेपाच हजार पार ! या बाजारात मिळाला सर्वोच्च दर, वाचा आजचे बाजारभाव

Published by
Ajay Patil

Soybean Price Maharashtra : शेतकरी बांधवांना यंदा गेल्यावर्षीप्रमाणे सोयाबीनला विक्रमी दर मिळेल अशी आशा होती. मात्र, या हंगामात सोयाबीन दर सुरुवातीपासून दबावात आहेत. मध्यंतरी नोव्हेंबर महिन्याच्या आसपास सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली होती. त्यावेळी सोयाबीनला जवळपास 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळत होता.

मात्र त्यानंतर सोयाबीन बाजारभावात घसरण झाली. 6000 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणारा सोयाबीन 5000 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होऊ लागला. दरम्यान आता यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोयाबीन दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत.

आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5530 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. निश्चितच सोयाबीन उत्पादकांना किमान 7000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळण्याची आशा आहे.

मात्र तूर्तास सोयाबीन बाजार भाव उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा एवढा नाही. त्यामुळे सोयाबीनची आवक मंदावली आहे. भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5155 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5440 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5325 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 115 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 695 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4990 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5245 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

लासलगाव- निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 303 क्विंटल पांढरा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5561 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5530 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 796 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5410 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5205 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

वाशिम- अनसिंग कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 600 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5550 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5250 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 301 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5476 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5400 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

अहमहपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1800 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5460 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5230 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मुरुड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 170 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5326 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5288 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 103 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5365 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

Ajay Patil