Soybean Rate : सोयाबीन बाजार भाव गेल्या काही दिवसांपासून स्थिर पाहायला मिळत होते. मात्र आज सोयाबीन दरात थोडीशी घसरण झाली आहे. पैठण एपीएमसी मध्ये सोयाबीन बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा खाली गेले आहेत. यामुळे साहजिकच उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
खरं पाहता, गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी देखील तशीच काहीशी परिस्थिती राहील आणि पदरी चार पैसे शिल्लक राहतील अशी सोयाबीन उत्पादकांना आशा होती.
मात्र, यावर्षी हंगाम सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत सोयाबीन दर फारसे असे वाढलेले नाहीत. मध्यंतरी सोयाबीन 6,000 रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विकला जात होता.
मात्र तदनंतर दरात घसरण झाली आणि बाजारभाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलवर येऊन ठेपलेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास सोयाबीन दर फिरत आहेत.
मात्र आज पैठण मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीन दरात घसरण झाली असून इतर एपीएमसी मध्ये देखील आज सोयाबीन बाजार भाव पाच हजार 200 रुपये प्रति क्विंटलच्या आतच राहिलेत.
यामुळे पुन्हा एकदा सोयाबीन उत्पादकांची दरवाढीची आशा मावळली आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यात सोयाबीनला काय दर मिळाला आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
जळकोट कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 144 क्विंटल पांढरा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5025 किमान दर मिळाला असून 5475 क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5175 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1 क्विंटल सोयाबीन पिवळा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4990 किमान दर मिळाला असून 4990 क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर देखील 4990 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
आष्टी- कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 131 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4820 किमान दर मिळाला असून 5400 क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5165 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.