Soybean Rate Maharashtra : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक, परंतु यंदाच्या वर्षाला हे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. सोयाबीनला बाजारात अपेक्षित दर मिळत नसून यामुळे शेतकरी बांधव फारच चिंतेत आहेत.
राज्यातील अनेक बाजारांमध्ये सोयाबीन अक्षरशः हमीभावापेक्षा कमी बाजारभावात विकले जात असून यामुळे पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे आहे. दरम्यान आज आपण राज्यातील काही प्रमुख बाजारांमधील सोयाबीनचे दर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : खानदेशातील जळगाव एपीएमसी मध्ये आज सोयाबीनला सर्वाधिक म्हणजेच 4892 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. या बाजारात आज 458 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली होती. यामालाला आज येथे चार हजार 892 रुपये प्रति क्विंटल असा किमान, कमाल आणि सरासरी भाव मिळाला असून हा राज्यातील सर्वाधिक भाव असल्याची नोंद करण्यात आली आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती : किनवट एपीएमसी मध्ये आज पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाला आहे. या बाजारात पिवळा सोयाबीन किमान 4892, कमाल 4892 आणि सरासरी 4,892 या भावात विकला गेला असून पिवळ्या सोयाबीनला मिळालेला हा सर्वाधिक दर ठरला आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती : मराठवाड्यातीलच जालना एपीएमसी मध्ये आज पिवळ्या सोयाबीनची 3454 क्विंटल आवक झाली. या मालाला आज जालना एपीएमसी मध्ये किमान 3000, कमाल 4700 आणि सरासरी 3950 असा भाव मिळाला.
बीड कृषी उत्पन्न बाजार समिती
: बीड एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला किमान 3850, कमाल 4850 आणि सरासरी 490 असा दर मिळाला. बीड ए पी एम सी मध्ये आज 85 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली होती.