ST Ticket Rate : काल दसऱ्याचा अर्थातच विजयादशमीचा आनंददायी सण साजरा झालाय. आता दिवाळीचा मोठा पर्व येणार आहे. दिवाळी सणाला नेहमीच शहरात कामानिमित्त स्थायिक झालेले नागरिक आपल्या मूळ गावाकडे, मामाच्या गावाकडे परतत असतात. भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते.
दरम्यान दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने यंदा दिवाळी काळात एसटी तिकीट दरात वाढ केली आहे.
ही हंगामी भाडेवाढ आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने दहा टक्के भाडेवाढ जाहीर केलेली आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात एसटी महामंडळ हंगामी भाडेवाढ करत असते.
यानुसार यंदाही दिवाळीच्या आधीच हंगामी भाडे वाढ जाहीर करण्यात आली आहे. यामुळे दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांना एसटीने प्रवास करताना आपला खिसा खाली करावा लागणार आहे.
दिवाळीनिमित्त घराकडे निघालेले चाकरमाने, विद्यार्थी तसेच सुटीच्या काळात पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांना खिसा हलका करावा लागणार आहे. दरवर्षी महसूल वाढीच्या हेतूने एसटी महामंडळाकडून ही हंगामी भाडे वाढ केली जाते. ही हंगामी भाडे वाढ परिवर्तनशील असते.
या भाडेवाढ नुसार सर्व प्रकारच्या एसटीच्या तिकीटदरात वाढ झालेली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की ही भाडेवाढ 25 ऑक्टोबर 2024 ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी लागू राहणार आहे.
यानंतर मात्र आधीच्या तिकीट दरानुसार भाडे आकारले जाणार आहे. नक्कीच एस टी महामंडळाच्या या निर्णयामुळे दिवाळी काळात एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे या निर्णयाचा महामंडळाला फायदा होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळ सातत्याने तोट्यात आले आहे. अशा परिस्थितीत एस टी महामंडळाचा हा निर्णय महामंडळाच्या महसुलात वाढ करून आणेल, असा विश्वास महामंडळाला आहे.
एसटी महामंडळ व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार, दिवाळीच्या हंगामात सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. परिवर्तन, शिवनेरी, शिवशाही आदि सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीटांमध्ये १० टक्के भाडेवाढ केली जाणार अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून यावेळी समोर आली आहे.