फक्त 5 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, गावातही सुरु करता येणार फॅक्टरी, महिन्याकाठी होईल लाखोची कमाई

Ahmednagarlive24 office
Published:
Small Business Idea

Small Business Idea : ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होत नसल्याने गावाकडील तरुण वर्ग आता शहराकडे स्थलांतरित होऊ लागला आहे. यामुळे गावे ओसाड होऊ लागली आहेत.

अनेकांना इच्छा नसतानाही पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून शहरात हलावे लागते. पण जर तुम्हाला गावातच राहायचे असेल आणि रोजगार देखील हवा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक बिजनेस प्लॅन घेऊन आलो आहोत.

आज आपण अशा व्यवसायाबाबत जाणून घेणार आहोत जो तुम्ही तुमच्या गावातूनच सुरू करू शकता आणि यातून लाखो रुपयांची कमाई सुद्धा तुम्हाला करता येणार आहे.

कोणता आहे तो बिजनेस

आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो आहे कुल्हडं बनवण्याचा व्यवसाय. अलीकडे कुल्हडं चहा, लस्सी, उसाचा रस, पिज्जा इत्यादी खाद्यपदार्थ सर्व्ह करण्यासाठी वापरले जाऊ लागले आहे. यामुळे बाजारात याची सातत्याने मागणी वाढत आहे.

कुल्लड चहा किंवा तंदुरी चहा तर आपल्याकडे खूपच फेमस झाला आहे. गल्ली-बोळात तंदुरी चहाची दुकाने तुम्हाला पाहायला मिळतील. अशा परिस्थितीत तुम्ही या संधीचे सोने करू शकता आणि हा व्यवसाय सुरू करून,

अशा दुकानदार लोकांना कुल्लड सप्लाय करून एक मोठी कमाई करू शकणार आहात. दरम्यान आता आपण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो आणि यातून किती कमाई होऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत.

कसे बनतात कुल्लड

कुल्हडं बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून चांगल्या प्रतीची माती लागणार आहे. यासाठी लागणारी माती कोणत्याही नदी किंवा तलावाच्या किनाऱ्यावर तुम्हाला अगदी सहजतेने उपलब्ध होणार आहे. ही माती एका साच्यात ठेवून ती चाकाने फिरवून कुल्हड तयार केला जातो.

विशेष म्हणजे आता लाकडी चाकाची देखील गरज राहिली नाही इलेक्ट्रॉनिक चाक देखील बाजारात आले आहे. हे इलेक्ट्रॉनिक चाक खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासनाकडून मदत देखील मिळणार आहे. किंवा तुम्ही बँकेतून कर्ज घेऊनहीं हे इलेक्ट्रिक चाक खरेदी करू शकता.

दरम्यान चाकावर तयार करण्यात आलेले कुल्हड मजबूत करण्यासाठी आगीत भाजावे लागते. यासाठी लाकूड किंवा कोळशाची भट्टी लागते. अशा प्रकारे तयार केलेला मातीचा कुल्हड तयार होतो. ज्याचा वापर दुकानदार चहा, दही, आईस्क्रीम इत्यादी खाद्यपदार्थ विकण्यासाठी करतात.

किती गुंतवणूक करावी लागणार ?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खूपच कमी गुंतवणूक करावी लागणार आहे. हा बिजनेस तुम्ही फक्त 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून सुरू करू शकणार आहात. या व्यवसायाची विशेषता अशी की एकदा रक्कम गुंतवले की पुन्हा तुम्हाला कोणतीच मोठी रक्कम गुंतवावी लागणार आहे.

कुल्हडं बनवण्यासाठी यंत्रसामग्री आणि कच्चा माल म्हणजेच माती यासाठी सुरुवातीला तुम्हाला पाच ते दहा हजारापर्यंत ची गुंतवणूक करावी लागू शकते. यानंतर तुम्ही तुमची कुल्हडं बनवण्याची फॅक्टरी तुमच्या घराच्या दारात किंवा कोणत्याही मोकळ्या जागेत लावू शकता.

किती कमाई होणार बर ?

गेल्या काही वर्षांपासून देशात प्लास्टिक वापरावर निर्बंध लावण्यात आले आहेत. प्लास्टिकमुळे वाढणारे प्रदूषण हा संपूर्ण भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. यामुळे आपल्या देशात सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.

परिणामी आता प्लॅस्टिक पिशव्या ऐवजी ज्यूट किंवा कागदी पिशव्यांची मागणी वाढू लागली आहे. शिवाय चहासाठी वापरले जाणारे प्लास्टिक कप देखील आता बंद झाले आहेत. त्याऐवजी कुल्हडं वापरले जाऊ लागले आहेत.

यामुळे कुल्हडंला आधीच्या तुलनेत दुपटीने मागणी आहे. सध्या चहाचे कुल्लडचे शेकड्याचे भाव 50 रुपयाच्या आसपास आहेत. त्याचप्रमाणे दूध, दही, लस्सीसाठीच्या कुल्लडचे दर शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत आहे,

तर आईस्क्रीमसाठी कुल्लडचा दरही शंभर ते दीडशे रुपय प्रति शेकडापर्यंत आहे. शिवाय आगामी काळात या किमतीत अजून वाढ देखील होण्याची शक्यता आहे. यामुळे गावात सुरू केलेला हा व्यवसाय लवकरच लाखों रुपयांचे उत्पन्न मिळवून देऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe