SBI Personal Loan:- आयुष्यामध्ये आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा अचानकपणे आपल्याला काही कारणास्तव मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते व ती गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढी बचत आपल्याकडे नसते. त्यामुळे साहजिकच कर्जाचा पर्याय निवडला जातो व यामध्ये मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून कर्जरूपाने किंवा उसनवारीने पैसे मागितले जातात किंवा बँक व इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
आपल्याला माहित आहे की देशातील प्रत्येक बँकेच्या माध्यमातून व्यक्तीला पर्सनल लोन मिळत असते व जास्त करून अशा परिस्थितीत पर्सनल लोनचाच पर्याय निवडला जातो.
त्याचप्रमाणे देशातील अग्रगण्य असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया देखील आर्थिक गरजेवेळी अर्जदाराला दहा हजारापासून ते पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज देऊ शकते. त्यामुळे या लेखात आपण एसबीआय बँक पर्सनल लोन विषयी माहिती बघू.
कसे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पर्सनल लोनचे स्वरूप?
तुमची आर्थिक गरज भागवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे पर्सनल लोन एक चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या क्रेडिट प्रोफाइलच्या आधारावर या बँकेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकतात.
इतक्याच काहीतर अर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री व सिबिल स्कोर जर उत्तम असेल तर यामध्ये बँक तुम्हाला पंधरा लाख रुपयांपर्यंत देखील पर्सनल लोन देऊ शकते.
कसे आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे पर्सनल लोनचे व्याजदर?
1- जर अर्जदार हा संरक्षण/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/ भारतीय तटरक्षक दलात नोकरीला किंवा कार्यरत असतील तर अशा अर्जदारांसाठी 11.45% ते 12.95% इतका व्याजदर आकारला जातो.
2- जर अर्जदार केंद्र व राज्य सरकार / पोलीस / रेल्वे खात्यात काम करणारा असेल तर अशा कर्मचाऱ्यांसाठी पर्सनल लोनवर 11.60% पासून ते 14.10% पर्यंत व्याजदर आकारला जातो.
3- अर्जदार जर कार्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरीला असेल व त्याने जर अर्ज केला तर अशा अर्जदाराला पर्सनल लोनसाठी वार्षिक 12.60% ते 14.60% पर्यंत व्याजदर आकारला जातो.
4- जर अर्जदाराचे पगार खाते जर भारतीय स्टेट बँकेमध्ये असेल तर अशा ग्राहकाकरिता पर्सनल लोनसाठी 11.45% ते 11.95% इतका व्याजदर आकारला जातो.
काय आहे एसबीआय एक्सप्रेस क्रेडिट योजना?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक्सप्रेस क्रेडिट योजना राबवली जात असून या अंतर्गत ग्राहकांना पूर्व मंजूर कर्ज उपलब्ध करून दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून कर्जाची रक्कम अर्जदाराच्या खात्यात अर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच जमा केली जाते.
स्टेट बँक ऑफ इंडियाची उत्सव धमाका योजना
या योजनेअंतर्गत बँकेच्या ग्राहकांना पर्सनल लोन वर कुठल्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही व प्रोसेसिंग शुल्क विना कर्ज दिले जाते. तुम्हाला जर एसबीआय बँक उत्सव धमाका योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला ते 31 जानेवारी 2025 पर्यंत घेता येणार आहे. कारण बँकेच्या या योजनेची अंतिम मुदत 31 जानेवारी 2025 आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पर्सनल लोनसाठी आवश्यक पात्रता
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर त्याकरिता तुमचे या बँकेमध्ये ग्राहक खाते असणे गरजेचे आहे व ते खाते कमीत कमी सहा महिने जुने असावे.
2- तसेच कर्जासाठी आवश्यक निकषांमध्ये सिबिल स्कोर उत्तम असणे खूप गरजेचे आहे.
3- तुम्हाला जर पर्सनल लोन घ्यायचे असेल तर त्या करिता सिबिल स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
4- संबंधित अर्जदाराकडे उत्पन्नाचा निश्चित स्त्रोत असणे गरजेचे आहे. ज्या माध्यमातून कर्जाची परतफेड करणे ग्राहकाला शक्य होईल.
5- तसेच हे कर्ज घेण्यासाठी आवश्यक असणारी सगळी कागदपत्रे अर्जदाराकडे असणे गरजेचे आहे व त्यासोबतच अर्जदार हा एका निश्चित पत्त्यावर राहणारा असावा.
या तीन पर्यायांच्या माध्यमातून तुम्हाला घेता येईल एसबीआयकडून पर्सनल लोन
तुम्हाला देखील स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर त्याकरिता तुम्ही एसबीआय योनो ॲप, स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाईट किंवा एसबीआयच्या अधिकृत बँक शाखेत जाऊन अर्ज करू शकतात.
विशेष म्हणजे या तिन्ही प्रकारांमध्ये कर्जाचे नियम आणि अटी देखील सारख्याच राहतात व सर्व ऑफर देखील सारख्याच लागू होतात.अधिक माहितीसाठी तुम्ही नजिकच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क साधू शकता.