State Employee : राज्य कर्मचारी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार नाही असं सांगितल्यापासून सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. अशातच पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी नववर्षाच्या पूर्वसंध्येला समोर येत आहे.
खरं पाहता या कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या धरतीवर या कर्मचाऱ्यांना देखील सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे अशी मागणी सदर कर्मचाऱ्यांकडून वारंवार केली जात होती. आता सरकार या राज्य कर्मचाऱ्यांची ही मागणी निकाली काढण्यात आली आहे.
आता या जवळपास 11000 कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची वाढीव वेतनाची ५० टक्के रक्कम जानेवारी महिन्यापासून दिली जाणार आहे. मात्र याबाबत मंगळवारी आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये देण्यात आली आहे.
खरं पाहता या निर्णयाची अंमलबजावणी जानेवारी महिन्यापासून होणार असल्याची माहिती पीएमपीएलचे अध्यक्ष यांनी दिली आहे.खरं पाहता या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे यासाठी शिंदे गट शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी वारंवार मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.
या पार्श्वभूमीवर पीएमपीएल चे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांनी काल एक बैठक घेतली. या बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या फरकानुसारची ५० टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भानगिरे यांनी सकाळ समूहाशी बोलताना दिली आहे. दरम्यान जानेवारी २०२३ मध्ये यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही महापालिका आयुक्तांची संयुक्त बैठक होणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या बैठकीनंतर सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर उर्वरित ५० टक्केवाढीनुसार वेतन देण्यास सुरवात केली जाणार आहे. निश्चितच पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. खरं पाहता गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीएलचे कर्मचारी वाढती महागाई लक्षात घेता वेतन आयोगात सुधारणा करण्याची मागणी करत होते.
अखेरकार मुख्यमंत्री यांना केलेल्या पाठपुराव्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगात सुधारणा झाली असून त्यांना याचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.