स्पेशल

मोठी बातमी ! ‘त्या’ प्राध्यापकांच्या वेतनवाढीचा प्रश्न लागला मार्गी, शासन निर्णय जारी; आता ‘इतकं’ वाढणार मानधन, पहा…..

Published by
Ajay Patil

State Employee News : राज्य शासनाच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी अधिवेशनात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या मानधनवाढी संदर्भात देखील निर्णय झाला होता. मात्र या तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा शासन निर्णय काढण्यात आलेला नव्हता. त्यामुळे याचा शासन निर्णय नेमका केव्हा निर्गमित होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.

दरम्यान आता काल म्हणजेच 27 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून या संबंधित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार आता तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या मानधन वाढीचा प्रश्न निकाली लागला आहे. अशा परिस्थितीत आज आपण प्राध्यापकांना नेमकी किती वेतन वाढ मिळणार आहे? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- शिक्षकांसाठी खुशखबर ! ‘त्या’ शाळांना मिळणार 20% अनुदान, तब्बल 63 हजार शिक्षकांच्या वेतनात होणार वाढ

किती वाढणार मानधन?

उच्च शिक्षण संचालनालय अंतर्गत येणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता 1000 रुपये प्रति तास व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता 1000 रुपये तास इतकं मानधन तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मिळणार आहे. तसेच उच्च शिक्षण संचालनालय अंतर्गत येणाऱ्या शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण विधीवर या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता एक हजार रुपये प्रति तास इतकं संबंधित

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मार्गांवरील मेट्रोची चाचणीही झाली यशस्वी; आता ‘त्या’…

प्राध्यापकांना मानधन मिळणार आहे.

यासोबतच तंत्र शिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान प्रति तास 1500 रुपये मानधन आणि पदवी / पदव्यत्तर अभ्यासक्रमांसाठी 900 रुपये प्रति तास इतकं मानधन प्राध्यापकांना दिल जाणार आहे. याशिवाय पदविका अभ्याक्रमांसाठी तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना आठशे रुपये प्रति तास मानधन मिळणार आहे.

तसेच कला संचालनालय अंतर्गत उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यानाला 1500 रुपये प्रति तास मानधन दिल जाणार आहे. आणि कला शिक्षण पदविका तसेच पदवी / पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रमाला तासिका तत्वावर असलेल्या प्राध्यापकांना 900 रुपये प्रति तास मानधन आता दिल जाणार आहे.  

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; नाबार्डकडून डेअरी व्यवसायासाठी मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं कर्ज, पहा…

Ajay Patil

Published by
Ajay Patil