State Employee News : गेल्या महिन्यात पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कर्मचारी हिताच्या अनेक घोषणा करण्यात आल्या. अनेक कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली. तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली.
सोबतच कोतवालांच्या मानधनात देखील वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. आता या घोषणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे. राज्यात कार्यरत असलेल्या कोतवालांच्या मानधन वाढीला वित्त विभागाने मान्यता दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आत्तापर्यंत राज्यातील कोतवालांना साडेसात हजार रुपये प्रति महिना इतकं मानधन मिळत होते.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा; आता मिळणार ‘इतकं’ वेतन
वाढती महागाईचा विचार केला असता मिळणारे मानधन हे खूपच तोकडे होते. परिणामी गेल्या अनेक दिवसांपासून कोतवालांचे मानधन वाढवले जावे अशी मागणी होती. यासाठी कोतवालांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा देखील केला. दरम्यान हा पाठपुरावा आता यशस्वी बनला आहे. राज्य शासनाने कोतवालांचे मानधन दुपटीने वाढवले आहे.
आता राज्यातील कोतवालांना 15000 प्रति महिना इतकं मानधन मिळणार आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली आहे. मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यातील कोतवालांना एक एप्रिल 2023 पासून मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे.
हे पण वाचा :- जर शासनाने ‘हा’ निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार दुपटीने वाढ ! वाचा याविषयी सविस्तर
वास्तविक राज्यात 12793 कोतवाल आहेत. अशा परिस्थितीत या सर्व कोतवालांना आता प्रतिमहा 15 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. निश्चितच शासनाच्या या निर्णयामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
वास्तविक राज्य शासनाने केलेल्या घोषणेनंतर 17 मार्च 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत कोतवाल मानधन वाढीला मान्यता देण्यात आली. तसेच आता वित्त विभागाची मान्यता याला मिळाली आहे. यामुळे कोतवालांना आता एप्रिल महिन्यापासून मानधन वाढीचा लाभ अनुज्ञय केला जाणार आहे.
हे पण वाचा :- खुशखबर ! सीआरपीएफ मध्ये होणार तब्बल 1 लाख 30 हजार रिक्त पदांची भरती, ‘या’ दिवशी सुरु होणार अर्ज प्रक्रिया