महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, पहा…..

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली असून याबाबतचे शासन परिपत्रक चार तारखेला निर्गमित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण पुढल्या वर्षी राज्य कर्मचाऱ्यांना किती दिवस सार्वजनिक सुट्ट्या राहणार याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Tejas B Shelar
Published:
State Employee News

State Employee News : डिसेंबर महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होईल. दरम्यान आगामी वर्षात महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना किती दिवस सुट्ट्या राहणार यासंदर्भात एक नवीन शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली असून याबाबतचे शासन परिपत्रक चार तारखेला निर्गमित करण्यात आले आहे.

अशा परिस्थितीत आज आपण पुढल्या वर्षी राज्य कर्मचाऱ्यांना किती दिवस सार्वजनिक सुट्ट्या राहणार याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी राहणार आहे.
19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त या दिवशी सुट्टी राहणार आहे.
26 फेब्रुवारी : महाशिवरात्री निमित्त या दिवशी सुट्टी राहणार आहे.
14 मार्च : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर 14 मार्चला सुट्टी राहणार आहे.
30 मार्च : गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर 30 मार्चला सुट्टी राहणार आहे.
31 मार्च : रमजान ईद निमित्ताने या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहणार आहे.
1 एप्रिल : बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता यावेत यासाठी या दिवशी फक्त बँका बंद राहणार आहेत.
6 एप्रिल : रामनवमी सणानिमित्त सुट्टी राहणार आहे.
10 एप्रिल : महावीर जन्म कल्याणक निमित्त सार्वजनिक सुट्टी राहणार आहे.
18 एप्रिल : या दिवशी गुड फ्रायडे निमित्त सार्वजनिक सुट्टी बहाल करण्यात आली आहे.
01 मे : महाराष्ट्र दिन निमित्त या दिवशी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी राहणार आहे.
12 मे : बुद्ध पौर्णिमा निमित्त या दिवशी सार्वजनिक सुट्टी बहाल करण्यात आली आहे.
07 जुन : बकरी ईद निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
06 जुलै : मोहरम निमित्त या दिवशी सार्वजनिक सुट्टी बहाल करण्यात आली आहे.
15 ऑगस्ट : स्वातंत्र दिन या राष्ट्रीय सणाच्या पार्श्वभूमीवर अन पारशी नववर्ष दिन निमित्त या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी राहणार आहे.
27 ऑगस्ट : गणेश चतुर्थी निमित्त या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहणार आहे.
05 सप्टेंबर : ईद – ए मिलाद सणा निमित्त या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
02 ऑक्टोंबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त अन विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहणार आहे.
21 ऑक्टोंबर : दिवाळी अमावस्या ( लक्ष्मीपुजा ) निमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
22 ऑक्टोंबर : दिवाळी ( बलिप्रतिपदा ) निमित्त सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
05 नोव्हेंबर : गुरुनानक जयंती निमित्त या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे.
25 डिसेंबर : ख्रिसमस निमित्त या दिवशी सार्वजनिक सुट्टी बहाल करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe