स्पेशल

मोठी बातमी ! ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 3 वर्षांनी वाढले

Published by
Tejas B Shelar

State Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे तसेच देशातील इतर 25 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. मात्र आपल्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अजूनही 58 वर्षे एवढेच आहे.

राज्य शासकीय सेवेतील संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे मात्र इतर अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वय हे अजून 58 वर्ष एवढेच आहे. यामुळे राज्यातील या सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे झाले पाहिजे अशी मागणी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून केली जात असून यासाठी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू आहे.

महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकार देखील याबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. पण अजून यासंदर्भात कोणताच सकारात्मक निर्णय झालेला नाही. अशातच आता मध्य प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे.

मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार आयुष विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डॉक्टर पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे तब्बल तीन वर्षांनी वाढवण्यात आले आहे.

आतापर्यंत या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष एवढे होते मात्र यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आणि हे वय 65 वर्षे एवढे करण्यात आले आहे. सेवानिवृत्तीचे वय तीन वर्षांनी वाढवण्यात आले असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे

आणि याचा राज्य सरकारला देखील मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घोषणा भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या आयुर्वेद महापर्व 2025 या कार्यक्रमांमध्ये करण्यात आली आहे.

सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचे प्रमुख कारण म्हणजे डॉक्टरांच्या अनुभवाचा अपव्यय टाळण्याचा आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात आले असल्याने डॉक्टरांचा अनुभव आता शासनाच्या कामी येणार आहे. या निर्णयामुळे डॉक्टरांच्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल, असे बोलले जात आहेत.

शिवाय डॉक्टर पदाच्या शिक्षणासाठी लागणार कालावधी लक्षात घेवून सदर निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री महोदयांनी आयुष क्षेत्रातील इतर महत्वपुर्ण आवश्यक बाबीसाठी देखील विशेष तरतुद करण्याची घोषणा केली आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com