State Employee News : 10 जानेवारी 2023 राज्य कर्मचाऱ्यांसाठी हा दिवस विशेष आनंदाचा होता. या दिनी राज्य कर्मचाऱ्यांना के पी बक्षी समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या तसेच याच दिवशी राज्य कर्मचाऱ्यांना चार टक्के डीएवाडीचा लाभ देखील शासनाकडून अनुज्ञेय झाला. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना आता 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
महागाई भत्त्यात केलेली ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे. तसेच DA वाढीचा हा लाभ जानेवारी महिन्याच्या पेमेंट सोबत राज्य कर्मचाऱ्यांना देऊ केला जाणार आहे. साहजिकच जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंतची राज्य कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची थकबाकी देखील जानेवारी महिन्याच्या वेतनासोबत वर्ग केली जाणार आहे.
खरं पाहता, आता जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना डीएवाढीचा लाभ दिला जाईल तसेच जी थकबाकीची रक्कम आहे ती देखील याच महिन्याच्या देयकासोबत राज्य कर्मचाऱ्यांना देणे अपेक्षित आहे. मात्र अनेकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ लागू झाल्यानंतरही राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम ही निधीच्या आपूर्ततेअभावी वेळेवर मिळत नाही.
अशा परिस्थितीत या महिन्यात तसं होऊ नये या अनुषंगाने वित्त विभागाकडून DA लाभ आणि डीए फरकाच्या रक्कमेंसाठी मागणी संबंधित विभागाकडून मागवली गेली आहे. निश्चितच डीए वाढीचा लाभ आणि डीए थकबाकीची रक्कम विहित कालावधीत कर्मचाऱ्यांना मिळेल ही आशा आता व्यक्त केली जात आहे.
म्हणजे आहरण संवितरण अधिकाऱ्यांने आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या जानेवारी महिन्याच्या वेतनासोबत वाढीव 4% DA व DA फरकासाठी आवश्यक निधीची मागणी संबंधित कोषागार कार्यालयाकडे करणे आवश्यक राहणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार?
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, आतापर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना 34% महागाई भत्ता मिळत होता. म्हणजे महागाई भत्ता 6120 प्रति महिना मिळत होता. दरम्यान आता यामध्ये चार टक्के वाढ झाली आहे.
म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना आता 6840 महागाई भत्ता दर महिन्याला मिळणार आहे. म्हणजेच पगारात 720 रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक ही वाढ 8640 रुपये एवढी राहील.